...fight will against Chandrakant patil : Raju Shetty | ... तर चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात लढेन: राजू शेट्टी 
... तर चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात लढेन: राजू शेट्टी 

पुणे :  आघाडीची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. अशावेळी मी लढावे असे अनेकांनी सुचवले आहे. मात्र अजून माझी मानसिक तयारी झालेली नाही. मात्र, ग्रामीण भागातून लढणार असतील तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातही लढण्यास तयार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी पुण्यात स्पष्ट केले.
पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत मांडले. यावेळी त्यांनी काँग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडीच्या माहिती दिली. स्वत: शेट्टी, कपिल पाटील आणि शेकाप'चे जयंत पाटील यांची बैठक झाली असून लवकरच आघाडीच्या नेत्यांना यादी पाठवली जाईल. त्यात आम्ही 55 ते 60 जागांची मागणी करत असून आम्हाला 38 जागा देण्यास ते तयार असल्याचे ते म्हणाले. मात्र, चर्चा सुरू असून सकारात्मक निर्णय होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
मनसेने आमच्यासोबत यावे अशी इच्छा असून वंचित बहुजन आघाडीसाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मनसेसाठी काँग्रेसच्या काही नेत्यांचा विरोध असला तरी त्यांनाही सोबत घ्यावे असे आमचे मत आहे. 
 


Web Title: ...fight will against Chandrakant patil : Raju Shetty
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.