लहान मुलांच्या भांडणातून दोन गटात हाणामारी; चार जखमी, घरात केली तोडफोड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 22:47 IST2021-02-27T22:47:41+5:302021-02-27T22:47:58+5:30

एका गटाने दुसऱ्याच्या घरात घुसून  साहित्याची तोडफोड केली. घरातून मोबाईल, पैसे लांबविण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. 

fight between two groups over child four injured house vandalized | लहान मुलांच्या भांडणातून दोन गटात हाणामारी; चार जखमी, घरात केली तोडफोड 

लहान मुलांच्या भांडणातून दोन गटात हाणामारी; चार जखमी, घरात केली तोडफोड 

जळगाव : लहान मुलांच्या भांडणातून तालुक्यातील कुसुंबा येथे शनिवारी रात्री आठ वाजता  दोन गटात तुफान हाणामारी झाली. त्यात भास्कर सोनवणे, अक्षय सोनवणे, मुन्ना सोनवणे व कुंदाबाई सोनवणे हे चौघे जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका गटाने दुसऱ्याच्या घरात घुसून  साहित्याची तोडफोड केली. घरातून मोबाईल, पैसे लांबविण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक कोळी, आकाश कोळी व भीकन कोळी हे तीघे गल्लीत बसून शिवीगाळ करीत होते. त्यांना जाब विचारल्याचा राग आल्यामुळे तीघांनी थेट हातात चॉपर घेऊन हल्ला चढवला. त्याआधी लहान मुलांमध्ये भांडण झाले होते. एका गटाने कुंदाबाई सोनवणे यांच्या घरात घुसून सर्व सामानाची तोडफोड केली. दगडाने वस्तु फोडल्या.  या हाणामारीत दीपक, आकाश व भीकन कोळी हे देखील जखमी झालेले आहे. त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: fight between two groups over child four injured house vandalized