शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अकरावी प्रवेशासाठी चढाओढ; राज्यात ३ लाख ९५ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 09:53 IST

मागील वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत यंदा नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.

ठळक मुद्देपुण्यातील ८४ हजार तर मुंबईतील २ लाख २८ हजार विद्यार्थी

पुणे:  राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील प्रमुख शहरांमधील ३ लाख ९५ हजार ६४३ विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. मागील वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत यंदा नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यावर्षी अकरावी प्रवेशसाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. 

 राज्यातील मुंबई पुणे पिंपरी-चिंचवड, नाशिक ,औरंगाबाद ,अमरावती ,नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने केले जात आहेत. त्यासाठी २४ जुलैपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ३ लाख ९५ हजार ६४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात मुंबईतील २ लाख २८ हजार २४८ ,पुण्यातील ८४ हजार १३३ , नागपुर मधील ३१ हजार ६०७ नाशिक मधील २५ हजार ९०३ औरंगाबादमधील १५ हजार ४११ अमरावती मधील १० हजार ३४१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

     मागील वर्षी राज्यातील १ हजार ६०५ कनिष्ठ महाविद्यालयांमधील ५ लाख ६० हजार ९८२ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातील ३ लाख ६६ हजार ४९५ जागांवर राज्यातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तर राज्यातील १ लाख ९४ हजार ३३५ जागा रिक्त राहिल्या होत्या.यंदा दहावीचा निकाल वाढला असून प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असणार आहे.

----------------

 महापालिका क्षेत्रनिहाय नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी (५ ऑगस्ट,सायंकाळी ६ पर्यंत)

 पुणे , पिंपरी-चिंचवड- ८४,१३३, मुंबई - २,२८,२४८,नागपूर-  ३१,६०७, नाशिक - २५,९०३, औरंगाबाद - १४,४११, अमरावती-  १०,३४१,

--------------

 गेल्या वर्षीची अकरावी प्रवेशाची आकडेवारी 

शहर       एकूण जागा   झालेले प्रवेश    रिक्त जागा

पुणे         १,०५,९१४       ६९,०५६       ३६,८५८ 

मुंबई        ३,२६,७९६       २,१८,७३०    १,०८,०६६

अमरावती १४,९४२          १०,४९१        ४,४५१

औरंगाबाद २९,४९०          १६,५४९        १२,८३१

नागपूर       ५८,८२०          ३२,४२५        २६,३९५

नाशिक       २५,०००          १९,२४४        ५,७५६

----------------------------

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयSSC Resultदहावीचा निकाल