पाचगणीत बालकाला कोंडून बदडले !

By Admin | Updated: August 11, 2015 22:46 IST2015-08-11T22:46:25+5:302015-08-11T22:46:25+5:30

अंगावर वळ : वसतिगृहचालकाविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल

Fifty-fifth child was shocked! | पाचगणीत बालकाला कोंडून बदडले !

पाचगणीत बालकाला कोंडून बदडले !

पाचगणी : ‘एज्युकेशन हब’ मानल्या गेलेल्या पाचगणीत एका वसतिगृहाच्या चालकाने अल्पवयीन विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलाच्या पालकांनी चेंबूर, मुुंबई येथील पोलीस ठाण्यात संबंधित वसतिगृहचालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. हा गुन्हा मंगळवारी पाचगणी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. चेंबूर व पाचगणी येथील पोलीस ठाण्यांतून मिळालेल्या माहितीनुसार, कबीर सुरेंद्र सिंह (वय ६, रा. निरावली, ता. जि. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) हा पूर्वी नितू रवीसिंह (२५ रा. रूम नंबर २५४, आर सी बॅरेक, रामापूर चेंबूर, मुुंबई, ७४) या आपल्या बहिणीबरोबर मुंबईत राहत होता. कबीरला चांगले शिक्षण मिळावे म्हणून पाचगणीत ठेवले होते. या ठिकाणावरील एका नामवंत शाळेत त्याला दाखल केल्यानंतर त्याला येथीलच आराध्य इंटरनॅशनल होस्टेलमध्ये ठेवले होते.
कबीर पहिलीत शिकत आहे. नितू सिंह मुंबईत राहते. ९ आॅगस्ट रोजी नितू कबीरला भेटण्यासाठी पाचगणीत आली होती. होस्टेलमध्ये नितू गेल्यावर होस्टेलचालक मल्हारी जाधवने ‘तुमचा मुलगा शाळेमध्ये भांडण करतो,’ असे सांगितले. तेव्हा नितूने कबीरला दोन दिवसांसाठी मुंबईला नेण्याचा निर्णय घेतला. प्रवासादरम्यान जेवायला थांबले असता कबीरने नितूला सांगितले की, ‘मला दोन दिवस जेवणच दिले नसल्याने मी उपाशी होतो. सरांनी मला बाथरूममध्ये बांधून बंद करून ठेवले होते.’ या सर्व प्रकाराने कबीर खूप घाबरला होता. याबाबत होस्टेलचालकावर कारवाई व्हावी, अशा आशयाची तक्रार चेंबूर पोलीस ठाण्यात दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी तपास करीत आहेत. (वार्ताहर)


खासगी रुग्णालयात उपचार
चेंबूर येथे घरी गेल्यावर कबीरने कपडे काढले असता कबीरच्या कमरेच्या खाली, मांडीवर, हातावर, कपाळावर व डोळ्याच्या बाजूला मारहाणीचे वळ दिसले. यासंदर्भात कबीरला विचारले असता मल्हारी जाधव व सुप्रिया नावाच्या व्यक्तीने काठीने मारले असून, त्याचे हे वळ असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर नितूने कबीरला खासगी रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Fifty-fifth child was shocked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.