शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या नुकसानीची माहिती देण्यासाठी दिले काही तास, पुरग्रस्तानंतर आता शाळांची सरकारकडून थट्टा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 05:25 IST

राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे अनेक जिल्हे सध्या पाण्याखाली आहेत. मुंबई आणि परिसरातही काही दिवसांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.

मुंबई: राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे अनेक जिल्हे सध्या पाण्याखाली आहेत. मुंबई आणि परिसरातही काही दिवसांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शाळांचे नुकसान झाले असण्याची शक्यता असून सदर नुकसानाची माहिती शिक्षण निरीक्षकांनी मुखाध्यापकांकडून मागवली आहे.विशेष म्हणजे शनिवारी या संबंधित परिपत्रक काढले असून मुख्याध्यापकांना संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ही माहिती वॉर्ड अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना दिले असल्याने मुख्याध्यापकच गोंधळल्याची परिस्थिती निर्माण झाली.मागच्याच आठवड्यात राज्यातील इतर भागांप्रमाणे मुंबईतही अतिवृष्टी झाल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. पावसाचा जोर इतका जास्त होता की यामध्ये काही शाळांचे नुकसान झाल्याची ही शक्यता आहे. त्यामुळे शहरातील सर्व अनुदानित / विना अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांकडून अशा नुकसानाची माहिती गोळा करून देण्याचे निर्देश शिक्षण निरीक्षकांनी मुख्याध्यापकांना शनिवारी दिले. मात्र ही माहिती गोळा कारण्यासाठी त्यांना अवघ्या काही तासांचाच कालावधी देण्यात आला. या वेळेत जर शाळांचे नुकसान झालेच असेल तर माहिती विस्तृत रूपात कशी द्यावी असा प्रश्न मुख्याध्यापकांपुढे उभा राहिला. प्रपत्रात जरी नुकसानीचा प्रकार आणि त्यासाठी आवश्यक दुरुस्तीसाठी अनुदानाची रक्कम भरायची असली तरी त्यासाठी जुजबी माहिती गोळा करून देणे आवश्यक असल्याचे मत काही मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. त्यामुळे इतक्या कमी वेळात माहिती कशी द्यावी हा पेच मुख्यध्यापकांपुढे उभा राहिला आहे.यासाठी गुगल फॉर्मची एक लिंक तयार करण्यात आली आहे. ही माहिती दिल्यानंतर ही ती मदत मिळेल की नाही याबाबतही मुख्याध्यापकांनी सवाल उपस्थित केला आहे. माहिती मागवली जाते मात्र शासन काही मदत देत नसल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई सचिव प्रशांत रेडीज यांनी दिली.

टॅग्स :Schoolशाळाfloodपूर