शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

उदयनराजेंच्या डोक्यात अजूनही सरंजामशाहीच! जितेंद्र आव्हाड यांची खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 16:25 IST

लोकशाही समजून घेण्याच्या ते सध्या मूडमध्ये नाही...

ठळक मुद्देसरकार कर्जमाफीमध्ये गंभीरपणे उर्वरीत सर्व शेतकऱ्यांना न्याय देणारसगळ्यांना माणूस म्हणून जगू द्या, असा आव्हाडांनी दिला सल्ला दिला.

बारामती : ते राजे महाराज आहेत आम्ही सामान्य प्रजेतली माणसं आहोत. त्यामुळे ते आम्हाला मारू शकतात. तसेच उदयनराजे यांच्या डोक्यात अजूनही सरंजामशाहीच आहे. पण देशात सध्या लोकशाही आहे हे त्यांना माहीतच नाही आणि लोकशाहीत सर्वजण समान आहेत हे समजून घेण्याच्या मूडमध्ये ते नाहीत,  अशी खरमरीत टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंवर केली. 

सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नितिन यादव यांच्या निवासस्थानी आव्हाड यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते, सुब्रमण्यम स्वामी, योगेश सोमण यांच्यासह उदयनराजे व त्यांच्या समर्थकांचा आव्हाड यांनी चांगलाच  समाचार घेतला. तसेच गृहनिर्माण व कर्जमुक्तीत सरकार गंभीरपणे काम करणार असल्याचे आश्वासनही दिले.  उदयनराजे यांना आपण लोकशाहीपूर्ण जगात आहोत हे अजूनही लक्षात येत नाही. डा. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या घटनेनुसार सर्वजण समान आहेत. भाजपाची महाराजांबद्दलची असूया अजून संपत नाही. कालच एका भाजपाच्या आमदाराने महाराजांची उंची मोदींमुळे आणखीन वाढली असे वक्तव्य केले. भाजपाने याबाबत खुलासा करावा, असे आव्हानही आव्हाड यांनी दिले. मंदीमुळे 'बिल्डींग' उद्योगही अडचणीत आहे. या उद्योगात बिल्डरसोबत 267 प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय त्यावर जगतात. वेगवेगळ्या प्रयोगातून  बिल्डर जिवंत ठेवून गरीबांना परवडतील अशी घरे मिळवून द्यावी लागतील. या इंडस्ट्रीला तीन महिन्यात सुगीचे दिवस आणण्यासाठीच साहेबांनी मला गृहनिर्माण दिले आहे. रीबांना घरासाठी मदत होणार असेल तर आक्रमकपणे या इंडस्ट्रीला जिवंत करण्यासाठी मोठ्या बँकांशी बोलतोय, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच सरकार कर्जमाफीमध्ये गंभीरपणे उर्वरीत सर्व शेतकऱ्यांना न्याय देणार आहे. दोन लाखांच्या वरील आणि नियमित कर्जदारांना मदत होणार आहे, असेही ते म्हणाले.

आव्हाड म्हणाले, तसेच सीएए, एनआरसी हा बहुजनांविरूध्दचा डाव आहे. वडील-आजोबांचे प्रमाणपत्र किंवा खापरपणजोबाची स्मशानभूमी आम्हाला सांगता येणार नाही. तुलनेने मुस्लिमांचा खानदानी कबरखाना असतो, ख्रिश्चनाचं रेकॉर्ड आहे. भटक्या विमुक्तांकडे, बहुजनांकडे काय रेकॉर्ड आहे? जमीन नाही किंवा वास्तव्याचा दाखला नाही. भाजपा असा जातीयवाद वाढवत आहे. माणसाला माणूस मानणार का नाही? असा सवाल त्यांनी केला. घटनेवर चचेर्वेळी प्रास्ताविका सुरू करताना देवाचे नाव टाकून सुरू करण्याबाबत डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी विरोध केला. जिजस, अल्ला, बुध्द अशीही नावे टाकायची का?  असा सवाल केला. त्यानंतर वुई द पिपल... अशी सुरवात केली. बहुसंख्यांकवादावर दादागिरी करता येत नाही. पण अजूनही भाजपाला समाजव्यवस्था समजत नाही ते पुन्हा जातीयवाद सुरू करत आहेत. इंग्रज काळात फासेपारध्यांसाठी सेटलमेंट कँप होता. आता त्यांच्यासाठी डिटेंशन कँप काढला जात आहे. आसाममध्ये मुसलमानांना टार्गेट करायला गेले आणि एकोणीस लाखापैकी चौदा लाख हिंदू निघाले. त्यामुळे ते फसले आहेत. स्थानिक हिंदू आणि बाहेरचे यांच्यात वाद लागलाय. माणूस म्हणून जगू द्या सगळ्यांना, असा आव्हाडांनी सल्ला दिला.

टॅग्स :BaramatiबारामतीJitendra Awhadजितेंद्र आव्हाडUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSanjay Rautसंजय राऊतNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा