शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीसाठी एफडीए सज्ज

By admin | Updated: October 9, 2016 02:06 IST

सणासुदीच्या काळात गोड पदार्थ, तेल, तुपाची मागणी वाढते. मागणी वाढल्याने पुरवठा करण्यासाठी या पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. या पदार्थांमध्ये केलेल्या भेसळीचा परिणाम

मुंबई : सणासुदीच्या काळात गोड पदार्थ, तेल, तुपाची मागणी वाढते. मागणी वाढल्याने पुरवठा करण्यासाठी या पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. या पदार्थांमध्ये केलेल्या भेसळीचा परिणाम आरोग्यावर झाल्यास सणासुदीला गालबोट लागू शकते. हे टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) दसरा आणि दिवाळीसाठी सज्ज झाले आहे. दसऱ्याला श्रीखंड, आम्रखंड, गुलाबजाम अशा गोड पदार्थांची मागणी वाढते. त्यामुळे अनेकदा या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. खव्यामध्येही भेसळ केली जाते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी कोकण विभागातील एफडीएच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. मिठाईची दुकाने आणि अन्य दुकानांची तपासणी करण्यास सांगितली आहे. या दुकानांतील पदार्थांचे नमुने गोळा करण्यात येणार आहेत. या नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेत केली जाणार असल्याची माहिती ठाण्याचे सहआयुक्त (अन्न) सुरेश देखमुख यांनी दिली. आॅक्टोबर महिनाअखेर दिवाळी आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात पदार्थांची खरेदी वाढणार आहे. यात तेल आणि तुपाचाही मोठ्या प्रमाणात समावेश असणार आहे. त्याचबरोबरीने मिठार्इंचा समावेशही असणार आहे. दुग्धजन्य पदार्थांमध्येही मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. या पदार्थांमध्ये केली जाणारी भेसळ सामान्य ग्राहक ओळखू शकत नाही. कारण, त्यात वेगळे असे काही दिसत नाही. या कारणांमुळे या सणासुदीच्या काळात ग्राहकांनीही सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन एफडीएने केले आहे. मिठाई खरेदी करताना दुकानाची विश्वासार्हता तपासून पाहा, असे एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)