शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

मॉन्सूनच्या वाटचालीच्या दृष्टीने अनुकूल वातावरण;विदर्भात उन्हाचा कडाका कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 8:47 PM

राज्यात गेल्या चार दिवसांपासून उष्णतेची लाट

ठळक मुद्देकोकण, गोव्यात पावसाची शक्यता विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ

पुणे : अंदमानच्या समुद्रात आगमन केलेल्या मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस अम्पन महाचक्रीवादळामुळे अडथळा निर्माण झाला होता. गेला आठवडाभर मॉन्सूनचा मुक्काम अंदमान समुद्र, निकोबार बेटे परिसरात आहे. येत्या २४ तासात दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि मध्य बंगालच्या उपसागरात आगमनाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण झाले असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. अंदमान समुद्रात मॉन्सूनचे १६ मे रोजी आगमन झाले आहे. त्यानंतर त्याची पुढे वाटचाल सुरु झालेली नाही. राज्यात विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट होती तर, मराठवाड्यात बर्‍याच ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात मंगळवारी सर्वाधिक कमाल तापमान नागपूर येथे ४६.८ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे २०.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.राज्यात गेल्या चार दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत ३ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.२७ ते २८ मे दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २९मे रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचीशक्यता आहे. ३० मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडे राहील.

इशारा : विदर्भात पुढील ३ दिवस बर्‍याच ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याचाइशारा हवामान विभागाने दिला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पुढील तीन दिवस पावसाचीशक्यता असून रायगड जिल्ह्यात २९ व ३० मे रोजी पावसाची शक्यता आहे. जळगाव,अहमदनगर, सोलापूर, परभणी, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २७ मे रोजीउष्णतेची लाट असणार आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) :

पुणे ३७.६,लोहगाव ३९.१, जळगाव ४४.७, कोल्हापूर ३६.१, महाबळेश्वर ३१.२, मालेगाव ४़६, नाशिक ३७.५, सांगली ३८़४, सातारा ३८.८, सोलापूर ४४.६, मुंबई ३४.८,सांताक्रुझ ३४.१, अलिबाग ३६.२, रत्नागिरी ३४.८, पणजी ३५.४, डहाणु ३४.७, अकोला ४६.५, अमरावती ४५.६, बुलढाणा ४३, ब्रम्हपूरी ४३.९, चंद्रपूर ४५.२,गोंदिया ४५, नागपूर ४६.८, वाशिम ४३.८, वर्धा ४६. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊसTemperatureतापमानweatherहवामान