दोन दुचाकींच्या धडकेत बाप लेकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 13:22 IST2021-10-04T13:22:25+5:302021-10-04T13:22:45+5:30
शहापूरच्या शेलवली येथील घटना, एक गंभीर

दोन दुचाकींच्या धडकेत बाप लेकाचा मृत्यू
भातसानगर : शहापूर तालुक्यातील शेलवली दरम्यान रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात बापलेकाचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घडली.
रस्त्याच्या बाजूला पावसाळ्यात वाढलेले गवत, झाडे झुडपे आणि पडलेले खड्डे यामुळे गावागावांतील रस्ते ही मृत्यूचे सापळे बनले आहेत. मंगळवारी सकाळी शेलवली रस्त्यावर झालेला अपघात याचे उदाहरण होते. सकाळी दहाच्या सुमारास शेलवली रस्त्यावर समोरासमोरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वरांना अंदाज न आल्याने जोरदार अपघात झाला. यामध्ये गणपत रिकामे रा.रानविहीर , (५०), नितीन रिकामे रा.रानविहीर(३५) या पितापुत्राचा मृत्यू झाला आहे.
त्यांना उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर यतिन पानसरे हा गंभीर जखमी असून त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.