वडिलांनी केले मुलाचे अपहरण
By Admin | Updated: June 10, 2016 05:04 IST2016-06-10T05:04:50+5:302016-06-10T05:04:50+5:30
चाळीमध्ये राहणाऱ्या रोमालेन मंडल या सात वर्षांच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या आईने खारघर पोलीस ठाण्यात केली होती.

वडिलांनी केले मुलाचे अपहरण
पनवेल : स्वत:च्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागण्याची घटना खारखरमध्ये घडली. खारघर सेक्टर १० मधील के. जी. पाटील चाळीमध्ये राहणाऱ्या रोमालेन मंडल या सात वर्षांच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या आईने खारघर पोलीस ठाण्यात केली होती. या प्रकरणात आरोपीने खंडणीसाठी मुलाच्या आईला पनवेल रेल्वे स्थानकात बोलावले असता, नंबर ट्रेस करून माहिती घेण्यात आली.
संबंधित मोबाइल नंबरचे लोकेशन खारघर मधील कोपरा गावातूनच असल्यामुळे पोलिसांनी साध्या वेषात टेहळणी सुरू केली. या वेळी घटनास्थळी एक तरुण संशयास्पद हालचाल करताना दिसला. त्याची चौकशी केली असता, त्याने आपले नाव रासेल शेख असल्याचे सांगितले. पोलीस खाक्या दाखवताच शेखने गुन्ह्याची कबुली देत, मुलाचे वडील मोहम्मद अजीवर मंडल (४२) यानेच मुलाचे अपहरण करण्यास सांगितले. (प्रतिनिधी)