मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू, 7 गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 12:56 IST2017-10-13T12:50:22+5:302017-10-13T12:56:19+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू, 7 गंभीर जखमी
महाड- मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पोलादपूरच्या पार्ले गावाजवळ भीषण अपघात झाल्याचं समजतं आहे. ट्रक आणि मिनीडोअर रिक्षाची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
मुझफ्फर येलुकर, नीलम अंबाजी कांबळे, नमीबाई जाधव, सोहम सचिन जाधव अशी मृतांची नाव आहेत. तर दशरथ सुतार
देवांश चाळके, अनिता गणपत पवार, इंदू तळेकर,गीता चाळके,रुद्र चव्हाण, संतोष कोळेकर अशी जखमींची नावं आहेत.