कर्नाटकातील बागलकोटमध्ये भीषण अपघात; सोलापुरातील सहा जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 13:16 IST2017-09-08T12:38:50+5:302017-09-08T13:16:06+5:30

कर्नाटकातील बागलकोटमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती मिळते आहे.

Fatal accidents in Bagalkot in Karnataka; Six people died in Solapur | कर्नाटकातील बागलकोटमध्ये भीषण अपघात; सोलापुरातील सहा जणांचा मृत्यू

कर्नाटकातील बागलकोटमध्ये भीषण अपघात; सोलापुरातील सहा जणांचा मृत्यू

ठळक मुद्दे कर्नाटकातील बागलकोटमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. बागलकोटमध्ये एका खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाल्याचं समजतं आहे.

बंगळुरू, दि. 8- कर्नाटकातील बागलकोटमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. बागलकोटमध्ये क्रूझर गाडी आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाल्याचं समजतं आहे. या अपघातात सोलापुरातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. तसंच इतर सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेले सहा जणही सोलापुरातील दारफळ येथील आहेत. कर्नाटकामध्ये औषध घेण्यासाठी सोलापुराती बारा जण गेले होते तेव्हा हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे.

वैद्यकीय उपचारासाठी कर्नाटकात रुग्णाला घेवून गेलेल्या माढा तालुक्यातील दारफळ येथील क्रूझर गाडीची बागलकोट तालुक्यातील बिळगी गावाजवळ शुक्रवारी सकाळी बसला धडक झाली. या  भीषण अपघातात दारफळसह परिसरातील सहा जणांचा जागीच मृत्यु झाला. 

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ येथील बारा जण गुरुवारी कर्नाटकात कॅन्सरच्या उपचारासाठी रुणाला घेवून गेले होते. शुक्रवारी सकाळी रुग्णासह इतर बारा प्रवाशांना घेवून निघालेल्या या क्रूझर आणि बसमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला. यात चालकासह सहा जणांचा जागीच मृत्यु झाला असून, उर्वरित सहा जण बचावले आहेत. घटनास्थळी तात्काळ वैद्यकीय तसंच पोलिसांचं पथक दाखल झालं. पण या अपघातातील जखमींची आणि मृत्यू झालेल्यांची नावं अजून समजलेली नाहीत, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे.

 

Web Title: Fatal accidents in Bagalkot in Karnataka; Six people died in Solapur

टॅग्स :Accidentअपघात