शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
3
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
4
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
5
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
6
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
7
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
8
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
9
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
10
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
11
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
12
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
13
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
14
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
15
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
16
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
17
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
18
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
19
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
20
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना धमकावलेच नाही, मनोरमा खेडकरांच्या वकिलांचा कोर्टात अजब दावा; वाचा सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 20:05 IST

Manorama Khedkar : सरकारी वकील आणि मनोरमा खेडकरांच्या वकिलांनी कोर्टात काय युक्तिवाद केला, ते जाणून घ्या... 

पुणे : आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात खेडकर कुटुंबाचे एकेक कारनामे उघड होऊ लागले होते. या प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पूजा यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरांना अटक करण्यात आली. यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी मनोरमा खेडकरांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मनोरमा खेडकर यांच्या वकिलांनी मनोरमा खेडकर यांचा शेतकऱ्यांना धमकावल्याचा व्हिडीओ न्यायाधीशांसमोर प्ले करून त्या शेतकऱ्यांना धमकावत नव्हत्या, असा अजब  दावा केला आहे. तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मनोरमा खेडकर यांनी दिले आहे. दरम्यान, सरकारी वकील आणि मनोरमा खेडकरांच्या वकिलांनी कोर्टात काय युक्तिवाद केला, ते जाणून घ्या... 

सरकारी वकिलांचा युक्तिवादमनोरमा खेडकर यांच्याकडून पिस्तूल जप्त करायचे आहे. मनोरमा खेडकर यांनी ज्या जमीनीवररुन वाद घातला त्या जमीनीची कागदपत्रे तपासायची आहेत. सकाळी सव्वा नऊ वाजता महाडमधून अटक केली आहे. पिस्तुल रिकव्हर करायचे आहे. गुन्ह्यात वापरलेली लँड क्रुझर गाडी ताब्यात घ्यायची आहे. आरोपी प्रभावशील व्यक्ती आहे. फिर्यादींवर दबाव आणू शकतात. इतर आरोपींना अटक करायची आहे. आरोपींची मुळशी तालुक्यात इतरही ठिकाणी मोठी जमीन आहे. या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांना धमकावले आहे का याचा तपास करायचा आहे. त्यासाठी पोलीस कोठडी मिळावी. मिडीया रिपोर्टस पाहून व्हायरल व्हिडीओ पाहून खेडकर यांच्या विरोधात तक्रार देण्याचे बळ आले. म्हणून त्यांनी एक वर्षाने तक्रार दिली. फिर्यादी पासलकर यांच्यावर दबाव होता. म्हणून ते तक्रार देत नव्हते.

मनोरमा खेडकरांचे वकील काय म्हणाले?आम्ही जमीन २००६ ला खरेदी केली आहे. पिस्तुलाचे लायसन्स आहे.आतापर्यंत आरोपीवर एक ही गुन्हा नाही. ३०७ कलम काल अचानक ॲड करण्यात आले आहे. त्याआधीचे सर्व सेक्शन बेलेबल आहेत. आम्ही तपासात सहकार्य करु. या प्रकरणी खेडकर यांच्या तक्ररीवरुन पासलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी तपास करुन चार्ज शीट दाखल केले आहे. असे, असताना एक वर्षाने पुन्हा त्याच घटनेत खेडकर यांना आरोपी करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टस पाहून एक वर्षाने तक्रार देण्यात आली आहे. एक वर्षाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे कारण ही पोलिसांनी दिलेले नाही. एक वर्षापूर्वी खेडकर यांनी या प्रकरणी पौड पोलीस स्टेशनला अर्ज दिला आहे. त्यांचे म्हणणे दिले आहे. २४ वर्षे खेडकर पिस्टल वापरत आहेत. मागील २४ वर्षात पिस्टलवरुन एक ही गुन्हा किंवा तक्रार नाही. आम्ही पिस्टल आणि लायसन्स सरेंडर करायला तयार आहोत. कोर्टाला मोबाईलवरील मनोरमा खेडकर यांचा व्हिडीओ दाखवला जात आहे. पासलकर यांचे आठ लोक घटनास्थळी उपस्थित होते, त्यामुळे त्यांनी पिस्टल हातात ठेवणे गैर नाही. घटनेच्या आदल्याच दिवशी खेडकर यांची गाडी आडवण्यात आली होती. त्यांना धमकावण्यात आले होते. आदल्या दिवशी खेडकर यांनी पौड पोलीस स्टेशनला तक्रार देखील दिली होती. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी पिस्टल बरोबर ठेवले होते.

तीन प्रकरणे मनोरमा यांना भोवली आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना मुजोरीपणामुळे अनेक गोष्टींना उत्तर द्यावे लागले. त्यांची पुण्यातून वाशीमला बदली केली गेली. शिवाय मसुरीतून त्यांना प्रशिक्षण थांबवण्याची सूचना आली. हे सर्व घडत असताना मनोरमा यांचे एक एक कारनामे समोर येत होते. आपल्या मुलीची सरकारी चौकशी सुरु असताना मनोरमा अरेरावी करताना दिसून आल्या. अखेर एका मागोमाग मनोरमा यांचे तीन कारनामे व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले. त्यानंतर मनोरमा खेडकर या पसार झाल्या होत्या. पौड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी त्यांची शोधमोहीम सुरु केली. अखेर महाड मधून त्यांना अटक करण्यात आली. मनोरमा यांना तिन्ही व्हिडिओची प्रकरणे चांगलीच भोवली असल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :ias pooja khedkarपूजा खेडकरPuneपुणेCourtन्यायालय