अपशब्द वापरणाऱ्या दानवेंना शेतकरी रडवतील - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 19:19 IST2019-01-09T19:07:16+5:302019-01-09T19:19:18+5:30
शेतक-यांविषयी अपशब्द वापरणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना आता शेतकरीच रडवतील

अपशब्द वापरणाऱ्या दानवेंना शेतकरी रडवतील - उद्धव ठाकरे
जालना - शेतक-यांविषयी अपशब्द वापरणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना आता शेतकरीच रडवतील, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. जालना येथे त्यांच्या उपस्थितीत बुधवारी शेतक-यांना मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूणच कार्यशैलीवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या सर्व योजना फसव्या आहेत. कर्जमाफी चुकीची असून आम्हाला कर्जमुक्ती हवी आहे, अशी मागणी केली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा कारखाना शेतक-यांच्या ऊसाला सर्वात कमी भाव देत आहे. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध रान उठवावे, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना दिले.