शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कलिंगडाच्या पिकात शेतकरी टाकतोय उसाचे चिपाड, त्यावर शिंपडतोय गुळाचे पाणी; कशासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 15:25 IST

Watermelon Farming Tips: शेतकऱ्याने लढविली शक्कल. कलिंगड या पिकाचे उत्पादन हे तीन महिन्यांत मिळते. त्यामुळे कमी वेळात जास्त उत्पन्न देणारे पीक आहे.

उन्हाळ्याचे दिवस येऊ घातले आहेत. बाजारात कलिंगड दिसू लागले आहेत. अद्याप उकाड्याला वेळ असला तरी तुम्हाला नैसर्गिक थंडावा देण्यासाठी शेतकरी कष्ट करत आहेत. अनेक एकरांमध्ये गावोगावी कलिंगडाची लागवड करण्यात येत आहे. लागवडीनंतर दोन-तीन महिन्यांतच फळे धरू लागतात. ती बाजारात येतात. लाल, रसाळ पाणी असलेली फळे लोक घेतात आणि उकाड्यात आपली तहान भागवतात. शेतकऱ्याला कमी वेळेत चांगले पैसे मिळतात. यासाठी उत्पादनही चांगले यावे लागते. म्हणून एका शेतकऱ्याने शक्कल लढविली आहे. 

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बु. येथील प्रगतिशील शेतकरी वसंत पाटील यांनी आपल्या सव्वा एकर शेत जमिनीत कलिंगडाचे पीक लागवड केली आहे. आता या वेलींना फुले येई लागली आहेत. येत्या दीड-दोन महिन्यांत त्यांचे पिक बाजारात जाईल. परंतू, चांगले पीक येण्यासाठी त्यांनी एक शकक्ल लढविली आहे. 

कलिंगडाच्या रोपांना फुले येऊ लागली आहेत. आता त्यांचा परागीकरणाचा काळ सुरु झाला आहे. फुलपाखरे, मधमाशा तिथे रुंजी घालणार आहेत. या फुलांचे चांगले परागीकरण होण्यासाठी व जास्त पीक येण्यासाठी पाटील यांनी शेतात ठिकठिकाणी रसवंती गृहातून टाकलेले उसाचे चिपाड आणून टाकले आहे. तसेच त्यावर गुळाचे पाणी शिंपडत आहेत. 

असे केल्याने काय होते...असे केल्याने गुळाच्या पाण्याच्या वासाला मधमाशी आकर्षित होते व या भागात येते. यामुळे शेतात परागीकरण होण्यास मदत होते. परागीकरण चांगले झाले तर फळधारणादेखील चांगली आणि मोठ्या प्रमाणावर होते. याचा उत्पादनावर परिणाम होतो व चांगले उत्पन्न मिळत असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

इतर शेतकऱ्यांनीही करावे का...पाटील यांना या गोष्टीचा अनुभव आला आहे. यामुळे त्यांनी इतर शेतकऱ्यांनाही हा प्रयोग करून पहावा. यासाठी जास्त खर्च नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी