शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

चिठ्ठीत मोदींचं नाव लिहून शेतकऱ्यानं केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 15:32 IST

आत्महत्येसाठी मोदींना धरलं जबाबदार

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे. यवतमाळमध्ये एका ५५ वर्षीय शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. विष प्राशन करुन त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या करत असल्याचं या शेतकऱ्यानं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिलं आहे. याशिवाय त्यानं मोदी सरकारला आत्महत्येसाठी जबाबदार धरलं आहे. यवतमाळच्या घाटनजीमधील राजुरवाडीत राहात असलेल्या शंकर भाऊराव चायरे यांनी मंगळवारी आत्महत्या करुन आयुष्य संपवलं. शंकर चायरे यांनी आत्महत्येपूर्वी सहा पानी चिठ्ठी लिहिली. 'मी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे आणि माझ्या आत्महत्येला मोदी सरकार जबाबदार आहे,' असे चायरे यांनी चिठ्ठीत म्हटलं आहे. यासोबतच चायरे यांनी त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याचं आवाहन केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे आमदार राजू तोडसम यांना केलं आहे. शंकर चायरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. 'त्या चिठ्ठीत पंतप्रधान मोदींच्या नावाचा उल्लेख आहे. शंकर चायरेंनी त्यांच्या आत्महत्येसाठी मोदींनाच जबाबदार धरलं आहे. मात्र आम्ही अद्याप त्या चिठ्ठीची सत्यता तपासत आहोत,' असे यवतमाळचे पोलीस अधीक्षक राज कुमार यांनी सांगितले. चायरे यांच्या नावावर नऊ एकर शेती आहे. त्यांच्यावर बँका आणि सावकरांचं १.४० लाख रुपयांचं कर्ज होतं. त्यामुळे ते तणावाखाली होते. याशिवाय बोंडअळीमुळे त्यांच्या शेतातील कापसाचं मोठं नुकसान झालं होतं.  

टॅग्स :Suicideआत्महत्याFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याNarendra Modiनरेंद्र मोदी