वारकरी संप्रदायात धर्मांध शक्तींची होतेय घुसखोरी, शरद पवार यांची टीका, भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 06:40 IST2026-04-12T06:39:08+5:302026-04-12T06:40:51+5:30

Sharad Pawar News: वारकरी सांप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही हे प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये ६० टक्के कीर्तनकार हे बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीने मांडणी करतात, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे.

Fanatical forces are infiltrating the Warkari sect, Sharad Pawar's criticism, BJP's counterattack | वारकरी संप्रदायात धर्मांध शक्तींची होतेय घुसखोरी, शरद पवार यांची टीका, भाजपचा पलटवार

वारकरी संप्रदायात धर्मांध शक्तींची होतेय घुसखोरी, शरद पवार यांची टीका, भाजपचा पलटवार

मुंबई -  वारकरी सांप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही हे प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये ६० टक्के कीर्तनकार हे बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीने मांडणी करतात, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. त्यावर ‘शरद पवार यांनी वारकरी सांप्रदायातील घुसखोर अर्बन नक्षलवाद्यांबद्दलही बोलावे, असा पलटवार प्रदेश भाजपने केला आहे. 

दिल्लीत आयोजित महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनानिमित्त काढलेल्या स्मरणिकेत शरद पवार यांचा लेख असून, त्यात त्यांनी काही मते व्यक्त केली आहेत. आता साधारण शंभरपैकी चाळीसएक लोक असे दिसतात की ते वारकरी सांप्रदायामध्ये कीर्तन, प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडत असतात. त्यांची अत्यंत गरज आहे. दुर्दैवाने या प्रबोधनाच्या मार्गावर महिला दिसत नाहीत. महिलांची बदनामी करणारे, त्यांच्यावर टवाळ विनोद करणारे वाढत चालले आहेत. अशा विनोदांना हसणाऱ्या महिला प्रेक्षकांत दिसतात. दुसरीकडे प्रतिगामी विचार मांडणाऱ्या महिला कीर्तनकारांची संख्या मात्र वाढताना दिस,ते हे दुर्दैव आहे. पुरोगामी मांडणी करणाऱ्या कीर्तनकारांची यादी आम्ही तयार करीत आहोत, असे पवार यांनी म्हटले आहे.  

अर्बन नक्षलवादावरही बोलायला हवे... 
- प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन पत्र परिषदेत म्हणाले, की वारकरी सांप्रदायाला धर्मांधतेशी जोडणे योग्य नाही. शरद पवार यांनी या सांप्रदायात घुसखोरी केलेल्या अर्बन नक्षलवाद, लव्ह जिहाद, लँड जिहादबाबतही बोलायला हवे होते. 
- भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी पवार यांच्यावर टीका केली. मात्र, आ. रोहित पवार म्हणाले, की सामान्य वारकरी आजही संतांचेच विचार घेऊन चालत आहेत, पण मनुवादी विचारांचे काही लोक या सांप्रदायावर अतिक्रमण करीत आहेत.

Web Title : वारकरी संप्रदाय में धार्मिक घुसपैठ, पवार की आलोचना, भाजपा का पलटवार।

Web Summary : शरद पवार ने वारकरी संप्रदाय में धार्मिक तत्वों की घुसपैठ की आलोचना की। उन्होंने प्रतिगामी विचारों में वृद्धि और प्रगतिशील महिला आवाजों में गिरावट देखी। भाजपा ने पलटवार करते हुए पवार से संप्रदाय के भीतर शहरी नक्सल प्रभाव को संबोधित करने का आग्रह किया, जबकि अन्य ने विभाजनकारी विचारधाराओं द्वारा अतिक्रमण को स्वीकार किया।

Web Title : Pawar criticizes religious intrusion in Warkari sect, BJP retaliates.

Web Summary : Sharad Pawar criticized religious elements infiltrating the Warkari sect. He noted a rise in regressive views and a decline in progressive female voices. BJP countered, urging Pawar to address urban Naxal influence within the sect, while others acknowledge encroachment by divisive ideologies.