शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही दुकानातून मिळणार रास्त धान्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 19:15 IST

राज्य सरकारने १५१ तालुक्यांव्यतिरिक्त १६८ महसुली मंडळामध्ये गंभीर आणि मध्यमस्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.

ठळक मुद्दे ९३१ गावांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती असल्याचे घोषित सध्या राज्यातील अन्नसुरक्षेतील लाभार्थ्यांना ई पॉस यंत्राद्वारे धान्य वितरीत

पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रोजगारासाठी विविध ठिकाणी स्थलांतरीत होणाऱ्या शेतकऱ्यांना संबंधित ठिकाणच्या रास्त धान्य दुकानातून धान्य वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे स्थलांतर झालेल्या ठिकाणच्या कोणत्याही रास्त धान्य दुकानातून धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने १५१ तालुक्यांव्यतिरिक्त १६८ महसुली मंडळामध्ये गंभीर आणि मध्यमस्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. त्या व्यतिरिक्त ९३१ गावांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती असल्याचे घोषित केले आहे. सध्या राज्यातील अन्नसुरक्षेतील लाभार्थ्यांना ई पॉस यंत्राद्वारे धान्य वितरीत केले जाते. या यंत्राच्या वापरामुळे कोणत्याही दुकानातून धान्य घेणे शक्य आहे. तशी सुविधा देखील ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दुष्काळी स्थितीत शहरी आणि निमशहरी भागात स्थलांतर होत असते. या काळात शिधापत्रिकेवरील धान्यापासून नागरीक वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थलांतरणाच्या ठिकाणी देखील शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठा व्हावा यासाठी दुष्काळी भागातील स्थलांतरीतांसाठी कोणत्याही दुकानातून धान्य मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारFarmerशेतकरीdroughtदुष्काळ