जग अनुभवणार फेसबुक लाईटची धूम

By Admin | Updated: June 6, 2015 01:24 IST2015-06-06T01:24:29+5:302015-06-06T01:24:29+5:30

सोशल नेटवर्किंगला एक वेगळी उंंची प्राप्त करुन देण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या फेसबुकने जगभरातील टेक्नोप्रेमींना अक्षरश: वेड लावले आहे.

Facebook lights will feel like the world | जग अनुभवणार फेसबुक लाईटची धूम

जग अनुभवणार फेसबुक लाईटची धूम

अनिल भापकर -औरंगाबाद
सोशल नेटवर्किंगला एक वेगळी उंंची प्राप्त करुन देण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या फेसबुकने जगभरातील टेक्नोप्रेमींना अक्षरश: वेड लावले आहे. एखाद्या मोठ्या देशाची लोकसंख्ये एवढी मोठी संंख्या फेसबुकचा वापर करणाऱ्यांची जगभरात आहे. जेव्हापासून फेसबुक मोबाईलवर आले तेव्हापासून तर या संंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. भारतातही फेसबुकचा वापर करणाऱ्यांची संंख्या लक्षणीय आहे. तरीसुद्धा स्मार्टफोन वापरणारा मोठा वर्ग फेसबुक चा वापर करत नाही कारण आहे स्लो इंटरनेट स्पीड. हाच धागा पकडून फेसबुक ने एक नवीन फेसबुक अ‍ॅप लाँच केले आहे ते म्हणजे फेसबुक लाईट. फेसबुक लाईट हे अण्ड्राईड अ‍ॅप असून ते जगभरातील अशा स्मार्टफोन धारकांसाठी बनविले गेले आहे ज्यांंच्या स्मार्टफोनवरील इंटरनेट स्पीड हा अत्यंत कमी असतो किंवा त्यांंच्या भागात फास्ट स्पीडचे इंटरनेट उपलब्धच नसते. अशा लोकांसाठी हे अ‍ॅण्ड्राईड अ‍ॅप तयार केले आहे. म्हणजेच हे अ‍ॅण्ड्राईड अ‍ॅप टु जी इंटरनेट धारकांसाठीसुद्धा अगदी व्यवस्थित काम करेल असे फेसबुक लाईटचे प्राडक्ट मॅनेजर विजय शंकर यांनी एका मुलाखतीत सांगितले. फेसबुक लाईट या अण्ड्राईड अ‍ॅपची साईज एक एमबी पेक्षा कमी असून अगदी काही सेकंदात हे अ‍ॅप तुमच्या स्मार्टफोनवर डाऊनलोड होईल तेही अगदी स्लो इंटरनेट स्पीड असला तरीही. हे अ‍ॅप सुरुवातीला आशिया तसेच लॅटीन अमेरिका, आफ्रिका व काही दिवसांतच युरोपात सुरु होईल.

Web Title: Facebook lights will feel like the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.