शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Rain Updates: मध्य महाराष्ट्र, कोकण पट्ट्यात अती मुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 15:10 IST

Extremely Heavy Rain Warning to Maharashtra: गणेशोत्सवात बाहेर पडत असाल तर सावधान. हवामाना खात्याने महाराष्ट्रासह गोव्याला इशारा दिला आहे.

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे कोकण पट्ट्यात, गोवा, मध्य महाराष्ट्रात, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ ओडीशा आदी भागात पुढील पाच दिवस तीव्र ते अति तीव्र स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. (Isolated extremely heavy falls also likely over Odisha, Gujarat state and Madhya Maharashtra on 13th and Konkan & Goa during 13th-14th September.)

Delhi Rain: हा दिल्ली विमानतळ आहे की समुद्र? मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणी तुंबले तसेच मध्य महाराष्ट्राला १३ सप्टेंबर आणि कोकण, गोव्यामध्ये १३-१४ सप्टेंबरला अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरावर सायक्लॉन सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हे वादळ उत्तर-पश्चिमेकडे सरकत आहे. यामुळे ओडीशा आणि पश्चिम बंगालच्या समुद्रकिनारी पुढील ४८ तासांत हे वारे आदळणार असून ते पुढे पुढील तीन दिवसांत ओडीशावरून छत्तीसगढकडे जातील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

दिल्लीत पावसाचा थैमान सुरुदेशाची राजधानी दिल्लीमध्ये रात्रभरापासून मुसळधार पाऊस कोसळत असून गेल्या दशकभरापासूनचा हा सर्वाधिक पाऊस आहे. यामुळे दिल्लीत ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचू लागले असून विमानतळावरदेखील रनवेसह परिसर जलमय झाला आहे. येथील पाणी पाहून हा दिल्लीचा विमानतळ आहे यावर विश्वास बसत नाहीय. दिल्लीला येणारी विमाने दुसरीकडे वळविण्यात आली आहेत. हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या 24 तासांत दिल्लीत 97 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पुढे आणखी काही तास पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जोरदार पावसामुळे दिल्लीच्या आयजीआय एअरपोर्टच्या टर्मिनल 3 मध्ये पाणी घुसले आहे. यामुळे लोकांना त्रास होत आहे. विमानतळावर टॅक्सीतून येणाऱ्या प्रवाशांना आत जाण्यासाठी पाण्यातून वाट काढत जावे लागत होते. अनेक लोक पावसामुळे विमानतळावरच थांबले आहेत. रनवेच्या आजुबाजुला पाणी भरले आहे.  

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र