शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

येत्या २४ तासांत कोकणात अतिवृष्टी तर, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 21:29 IST

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस

ठळक मुद्देरायगडला इशारा : ठाणे, मुंबई, रत्नागिरीत मुसळधार वर्षा

पुणे : कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. येत्या २४ तासात कोकणातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासात राज्यात कोकणात मंडणगड, राजापूर १६०,मार्मागोवा १५०, सावंतवाडी १३०, दाभोलीम, दापोली १२०, लांजा, पेडणे,संगमेश्वर, देवरुख ११०, मडगाव १००, चिपळूण, रामेश्वर ९०, गुहागर, खेड ८०,कानकोण, कणकवली, मालवण, केपे, श्रीवर्धन, वेंगुर्ला ७०, म्हापसा ६०,दोडामार्ग, खालापूर, कुडाळ, माथेरान, मुंबई (कुलाबा), वाल्पोई ५०, कर्जत,म्हसळा, मोखेडा ४० मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला.

मध्य महाराष्ट्रात गगनबावडा, राहुरी ११०, येवला ८०, लोणावळा, राधानगरी ७०, महाबळेश्वर ६०, रावेर ५०, चंदगड, जामनेर, मुक्ताईनगर, ओझरखेडा,पन्हाळा, शेवगाव ४०, आंबेगाव घोडेगाव, कोपरगाव, पाथर्डी, शाहूवाडी ३० मिमी पाऊस पडला.मराठवाड्यातील पाथरी ८०, भोकरदन ७०, गेवराई, जफराबाद ६०, गंगापूर, माजलगाव, पैठण ५०, आंबेजोगाई, फुलंब्री, उमारी ४०, अर्धापूर, लातूर,पालम, परभणी, पूर्णा ३०, आष्टी, बदनापूर, बीड, देगलूर, हिंगोली,खुलताबाद, मानवत, मुखेड, रेणापूर, सिल्लोड, सोयेगाव, वैजापूर २० मिमीपावसाची नोंद झाली.

विदर्भातील पौनी १३०, लाखनी ७०, देसाईगंज ६०, आरमोरी, भंडारा, भिवापूर ५०, ब्रम्हपुरी, देवरी, घाटंजी, कळंब, कारंजालाड, सडक अर्जुनी, साकोली,सेलू ४०, अकोला, आर्वी, भामरागड, बुलढाणा, चांदूरबाजार, एटापल्ली, हिंगणा, जळगाव जामोद, कंपटी, कोरची, कुही, मलकापूर, मौदा, मेहकर, मलू,चेरा, नंदूरा, नेर, पर्सेओनी, राळेगाव, संग्रामपूर, शेगाव, तिवासा,यवतमाळ ३० मिमी पाऊस पडला़ याशिवाय बहुतांश ठिकाणी हलका पाऊस झाला.

घाटमाथ्यावरील कोयना (पोफळी) ९०, लोणावळा, भिवपूरी ७०, वळवण, खंद ६०,शिरोटा, खोपोली ५०, शिरगाव, वाणगाव ४०, ठाकूरवाडी, डुंगरवाडी, कोयना(नवजा), भिरा ३० मिमी पावसाची नोंद झाली होती.

मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत महाबळेश्वर ४६, मालेगाव २४, मुंबई१४, रत्नागिरी २४, पणजी ९७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.राज्यात १७ जून रोजी कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. १८ जून रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानRainपाऊसFarmerशेतकरीMonsoon Specialमानसून स्पेशल