शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

अतिवृष्टीची माहिती ‘अ‍ॅप’वर मिळणार; केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयातर्फे सेवेत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 02:05 IST

केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने ‘मुंबई वेदर लाइव्ह’ नावाचे एक अ‍ॅप मुंबईकरांच्या सेवेत दाखल केले आहे. या अ‍ॅपद्वारे मुंबईतल्या पावसाची विशेषत: अतिवृष्टीची आगाऊ माहिती उपलब्ध होणार आहे.

मुंबई : केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने ‘मुंबई वेदर लाइव्ह’ नावाचे एक अ‍ॅप मुंबईकरांच्या सेवेत दाखल केले आहे. या अ‍ॅपद्वारे मुंबईतल्या पावसाची विशेषत: अतिवृष्टीची आगाऊ माहिती उपलब्ध होणार आहे.‘मुंबई वेदर लाइव्ह’ अ‍ॅपचा मुंबईकरांना अधिकाधिक फायदा होणार आहे. मुंबईमधील हवामान, पाऊस, अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटांसह हवामानाशी संबंधित माहिती,तसेच पाऊस कुठे पडणार आहे?याची सविस्तर माहिती मुंबईकरांना याद्वारे उपलब्ध होईल. मुंबईशहर आणि उपनगरासह नवी मुंबईतील १०० ठिकाणांचा यात समावेश असून, येथील हवामानाची माहिती मुंबईकरांना उपलब्धहोणार आहे. या व्यतिरिक्त तापमान, आर्द्रता, वारा आदीची माहितीही नागरिकांना उपलब्ध होणारआहे.जून महिन्यात पावसानेविशेषत: अतिमुसळधार पावसाने झोडपल्याने मुंबईची दैना झालीहोती. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर उर्वरित यंत्रणाअलर्ट असल्या, तरी पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने मुंबई विस्कळीतझाली होती. परिणामी, आता नागरिकांच्या सेवेत नव्यानेदाखल झालेल्या ‘अ‍ॅप’चा फायदा मुंबईकरांना किती होईल? हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.दरम्यान, वायुप्रदूषणाचे अंदाज वर्तविण्यासाठीच्या यंत्रणेवरही प्रशासन काम करत असून, ही यंत्रणा आॅक्टोबरमध्ये कार्यान्वित होईल. तर दुसरीकडे मान्सून अंदाज, हवामानाशी संबंधित वातावरण, समुद्री वातावरण, भूकंप, त्सुनामी आदीबाबतही यंत्रणांना अलर्ट करण्यासाठी तत्त्पर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.नवी मुंबईही ‘अ‍ॅप’वरमुंबईमधील हवामान, पाऊस, अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटांसह हवामानाशी संबंधित माहिती, तसेच पाऊस कुठे पडणार आहे? याची सविस्तर माहिती याद्वारे उपलब्ध होईल. नवी मुंबईतील १०० ठिकाणांचाही यात समावेश असून, येथील हवामानाची माहिती उपलब्ध होणार आहे.राज्यासह मुंबईत पावसाची विश्रांतीजूनसह जुलैच्या पूर्वार्धात बरसलेल्या पावसाने उत्तरार्धात मात्र विश्रांती घेतली आहे. उत्तर भारतात पावसाने थैमान घातले असले, तरी मुंबईसह राज्यात पाऊस चांगलाच विश्रांतीवर असून, आॅगस्टच्या पूर्वार्धात पाऊस पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईसह राज्याच्या लगतच्या प्रदेशात पावसासाठीचे वातावरण नाही. विशेषत: समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र, वाहते वारे, त्याची बदलती दिशा; असे असंख्य घटक पावसासाठी कारणीभूत ठरतात. मात्र, मुंबईसह लगतच्या प्रदेशात पावसासाठीचे वातावरण नसल्याने अधून-मधून एखाद दुसरी सर कोसळत आहे.गेल्या २४ तासांचा विचार करता कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. ३० जुलै रोजी कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३१ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.मुंबईचा विचार करता मुंबईतही पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. कुठे तरी एखाद दुसरी सर कोसळत असून, येथील वातावरण केवळ ढगाळ आहे. ३० जुलै रोजी शहर आणि उपनगरात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने विश्रांती घेतली असली, तरी पडझडीच्या घटना सुरूच असून, सात ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. चार ठिकाणी झाडे पडली. या दुर्घटनांत सुदैवाने मनुष्यहानी झालेली नाही.

टॅग्स :Rainपाऊस