शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs NZ ODI: भारताचा संघ जाहीर; अय्यर IN; ऋतुराज, तिलक OUT, बुमराह-पांड्याला विश्रांती
2
Donald Trump : "आमच्या कंपन्यांना बाहेर काढलं..."; व्हेनेझुएला एअर स्ट्राईकनंतर ट्रम्प यांचा जुना Video व्हायरल
3
"ते तर आता 'लीडर ऑफ पर्यटन'"; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर भाजपाची बोचरी टीका
4
टीम इंडियासाठी 'गुड न्यूज'! Shreyas Iyerला 'कमबॅक'साठी BCCIची मान्यता, 'या' तारखेला खेळणार
5
बांगलादेशात हिंदूंचं जगणं कठीण! एकाला खांबाला बांधून अमानुष मारहाण, प्रकृती चिंतानजक
6
Tarot Card: स्वामींचं नाव घेत एक कार्ड निवडा आणि पुढच्या आठवड्याचे साप्ताहिक भविष्य जाणून घ्या
7
हिवाळ्यात नारळ पाणी प्यावं की नाही? लोक हमखास करतात चूक, विसरु नका ‘ही’ योग्य वेळ
8
सोलापूर: निवडणुका बिनविरोध करण्यासाठीच 'तो' मर्डर! प्रणिती शिंदेंचा भाजपावर गंभीर आरोप
9
व्हेनेझुएलात युद्धाचा भडका; अमेरिकेने राष्ट्राध्यक्षांना पत्नीसह घेतले ताब्यात,ख्रिसमसलाच होणार होती कारवाई
10
अभिनेते आशिष विद्यार्थी यांचा अपघात, भरधाव दुचाकीस्वाराने दिली धडक; पत्नीही जखमी
11
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या मुली असतात निसर्गतः देखण्या आणि आकर्षक
12
Nashik: शिंदेसेनेतील अंतर्गत वाद उफळला, उमेदवाराचा पत्नीसह आत्महत्येचा इशारा, नेमकं प्रकरण काय?
13
सोन्यामध्ये ₹१९९९ ची घसरण, चांदीही चमकही झाली कमी; पाहा कशी होती आठवड्याची सराफा बाजाराची स्थिती
14
मोठी बातमी! बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांच्या विरोधात राज ठाकरेंकडे पुरावे; प्रकरण कोर्टात जाणार
15
99th Marathi Sahitya Sammelan: संमेलनस्थळी कार्याध्यक्षांना फासले काळे, संशयित पोलिसांच्या ताब्यात-video
16
Silver Price Today: ६०% स्वस्त होणार चांदी; जाणून घ्या का म्हणताहेत एक्सपर्ट्स असं?
17
Virat Kohli पुन्हा एकदा कसोटी क्रिकेट खेळताना दिसू शकतो! Gautam Gambhir चे नाव घेत कुणी केला मोठा दावा?
18
ड्रीमी प्रपोजल! क्रिती सनॉनच्या बहिणीचा झाला साखरपुडा, प्रसिद्ध गायकासोबत बांधणार लग्नगाठ
19
चुकीच्या UPI आयडीवर पैसे पाठवले गेले? घाबरू नका, 'या' सोप्या पद्धतीने मिळवा पैसे परत
20
Nashik Municipal Election 2026 : धावपळ, उत्कंठा अन् रंगलेले माघारी नाट्य! अपक्षांच्या मनधरणीसाठी मोठी कसरत
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीत नाराजीचा स्फोट, शिंदे गटातील मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव, तर उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या भेटीला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:21 IST

Mahayuti News: महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने अनेक ठिकाणी परस्परांचे कार्यकर्ते फोडून एकमेकांना धक्का देण्याचा कार्यक्रम सुरू केला होता. त्यावरून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी महायुतीमध्ये नाराजीचा स्फोट झाला.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यापासून राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील घटक पक्षांनी इतर पक्षांमधील नेत्यांना मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वळवण्यास सुरुवात केली होती. त्यातच महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने अनेक ठिकाणी परस्परांचे कार्यकर्ते फोडून एकमेकांना धक्का देण्याचा कार्यक्रम सुरू केला होता. त्यावरून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी महायुतीमध्ये नाराजीचा स्फोट झाला. शिवसेना शिंदे गटाच्या एकनाथ शिंदे वगळता इतर सर्व मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर शिंदे गटातील वरिष्ठ नेते आणि मंत्री उदय सांमत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी धाव घेतली. 

मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिल्यानंतर शिवसेनेचे मंत्री थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दालनात गेले. तसेच ‘तसेच, ‘तुम्ही जे करत आहात, ते योग्य नाही’, असे शिवसेनेच्या मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना जरा घुश्श्यातच सांगितलं. त्यावर ‘तुम्हीच उल्हासनगरमधून याची सुरुवात केली’, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली फोडाफोडी, विश्वासात न घेता घेतले जाणारे निर्णय आणि पुरवण्यात येणारा निधी, तसेच आपल्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना भाजपात देण्यात येत असलेला प्रवेश ही या नाराजीची कारणं असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्पार केली असतानाच शिंदे गटाचे वरिष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्यासाठी गेल्याचं वृत्त आलं आहे.  आज अद्वय हिरे यांच्या भाजपामध्ये होणाऱ्या प्रवेशाला रोखण्यासाठी सामंत यांनी रवींद्र चव्हाण यांच्या घरी धाव घेतल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र रवींद्र चव्हाण घरी उपस्थित नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.  दरम्यान, शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील अनुपस्थितीबाबत विचारलं असता नाराजीचं कुठलंही कारण नाही आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. सामंत म्हणाले की,  योगेश कदम हे खेडमध्ये आहेत, शंभुराज देसाई त्यांच्चा मतदारसंघामध्ये आहेत. संजय राठोड यांच्या आईचं निधन झाल्याने तेही येऊ शकले नाहीत. तर कोकणातील युतीबाबत चर्चा करण्यासाठी मी रवींद्र चव्हाण यांच्या घरी गेलो होतो, मात्र चव्हाण घऱी नसल्याने ही भेट होऊ शकली नाही, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahayuti Alliance Faces Discord: Shinde Faction Ministers Meet CM, Samant Meets Chavan

Web Summary : Discord erupts within Maharashtra's ruling Mahayuti alliance as Shinde faction ministers express displeasure, meeting with the Chief Minister. Uday Samant seeks to meet Ravindra Chavan amid local election tensions and disagreements over candidate selections and fund allocations.
टॅग्स :MahayutiमहायुतीLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRavindra Chavanरविंद्र चव्हाणUday Samantउदय सामंत