शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

"मी तर वारकऱ्यांमध्ये गेलो होतो पण..."; कार्यकर्त्याने पाय धुतल्यावर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 14:39 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाय धुण्याच्या व्हिडीओवरुन पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे.

Nana Patole Video : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन सध्या राज्यातलं राजकीय वातावरण चांगलेचा तापलं आहे. व्हिडीओमध्ये नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्याने हाताने धुतल्याचे समोर आलं आहे. अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. नाना पटोलेंच्या या व्हिडीओवरुन राष्ट्रवादी कांग्रेस, भाजपसह शिंदे गटाने टीका केली आहे. मात्र आता नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिलं. ईडीच्या कारवाईने जे अंधारात कोणाचे तरी पाय धुतात त्यांनाही दाखवा असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

सोमवारी अकोल्यातील वाडेगाव येथे मुक्कामी आलेल्या संत गजानन महाराज पालखी सोहळ्याला नाना पटोले यांनी हजेरी लावली. यावेळी पटोले यांची लाडूतुला देखील करण्यात आली. ही पालखी एका मैदानात थांबली होती आणि पावसामुळे तिथे मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता. या चिखलातून मार्ग काढत पटोले यांनी संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतलं. त्यानंतर गाडी बसण्यासाठी जात असताना एका कार्यकर्त्यांने त्यांचे पाय पाण्याने धुतले. कार्यकर्त्याने स्वतःच्या हाताने चोळून नाना पटोले यांचे पाय धुतल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर नाना पटोले नागपूरकडे रवाना झाले. मात्र नाना पटोलेंनी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं.

त्यानंतर आता नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. "तो व्हिडीओ मी पाहिला आहे. काल मी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे कार्यक्रमासाठी होतो. तिथेच गजानन महाराजांची पालखी तिथे मुक्कामासाठी होती.  ज्या मैदानात पालखी होती तिथे मी लोकांबरोबर पायी तिथे गेले. चिखल असल्याने माझे पाय खराब झाले.  पाय खराब झाल्यामुळे कार्यकर्त्याने पाणी आणलं आणि तो वरुन पाणी टाकत होता आणि मी हाताने पाय धुवत होतो. माझ्याबद्दल सध्या जास्त प्रेम आहे. पण ज्यांचे पाय ईडीने माखलेले आहेत ते अंधारात कोणाचे पाय धुतात हेसुद्धा दाखवा. मी तर वारकऱ्यांमध्ये गेले होतो. वारकऱ्यांना बदनाम करण्याचे काम फडणवीस सरकारच्या वेळी झालं. हर घर नल योजनेत नळच नाहीये. त्यामुळे वरुन पाणी टाकले," असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले.

"मी शेतकरी आहे. मला चिखलाची सवय आहे. चिखल आहे म्हणून गजानन महाजारांच्या पालखीचे आशीर्वाद घेणार नाही असं नाही. मी राजा नाही. मी काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही ⁠मी चिखलात राहणारा माणूस आहे. ⁠ईडी आणि सीबीआयने कोणाचे किती पाय माखले आहेत आणि कोण कोणाचे पाय पकडत आहे हे माहीत आहे," असेही नाना पटोले म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसSocial Viralसोशल व्हायरलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस