शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सीटीईटी देणाऱ्या शिक्षकांची निवडणूक कामातून मुक्तता, ‘लोकमत’च्या वृत्ताची आयोगाकडून दखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:19 IST

राज्यभरातील शिक्षकांना मोठा दिलासा

सांगली : राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच शिक्षकांसाठी बंधनकारक असलेली सीटीईटीची परीक्षा असल्याने सांगली जिल्ह्यातील १ हजार ४८४ शिक्षकांना सोमवारी निवडणूक कामातून वगळण्यात आले. राज्यभरातील परीक्षार्थी शिक्षकांचा आढावा घेत त्यांना वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्याची तातडीने दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने अशा शिक्षकांना निवडणूक कामातून मुक्त करण्याची सूचना दिली होती.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका दोन दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर निवडणूक कामात नियुक्त करण्यात आलेल्या राज्यभरातील शिक्षकांची कोंडी झाली आहे. सक्तीची असलेली सीटीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) ज्या दिवशी मतदान आहे त्याच दिवशी म्हणजे ७ फेब्रुवारीस आहे. ८ फेब्रुवारीलाही काही शिक्षकांची परीक्षा आहे. त्यामुळे शिक्षकांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला होता.‘लाेकमत’ने हा प्रश्न मांडल्यानंतर आयोगाने दखल घेत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आढावा घेत अशा शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, शिक्षणाधिकारी आणि निवडणूक विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी सीटीईटी परीक्षा देणारे एक हजार ४८४ शिक्षकांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक कामकाजातून वगळले आहे. यामुळे सीटीईटी परीक्षार्थी शिक्षकांची गैरसोय दूर होणार आहे.सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती संकलनराज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सीटीईटी परीक्षेला बसलेल्या व निवडणूक कामासाठी नियुक्त शिक्षकांची माहिती संकलित केली आहे. येत्या दोन दिवसांत राज्यातील अन्य शिक्षकांनाही निवडणूक कामातून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

निवडणूक कामातून वगळलेले तालुकानिहाय शिक्षकतालुका / मतदान केंद्र संख्या / एकूण नियुक्त कर्मचारी, अधिकारी/ नियुक्त रद्द शिक्षक संख्याआटपाडी / १५२ / ८२७ / १५८जत / २९२ / १६२० / ३३५खानापूर / १३० / ७१९ / १४७कडेगाव / १४८ / ६८० / १३४तासगाव / २०१ / ९६६ / १०७क.महांकाळ / १३० / ६९० / ११८पलूस / १२९ / ६०० / ६१वाळवा / ३६० / १७७६ / १९२शिराळा / १७१ / ७६० / ९५मिरज / ३२६ / १५७१ / १३७एकूण २०३९ / १०२०९ / १४८४

शिक्षकांना निवडणूक कामातून वगळल्यामुळे कडेगाव तालुक्यात १०६, तासगाव २५, पलूस २८ आणि शिराळा तालुक्यात ९५ कर्मचारी कमी पडले आहेत. या ठिकाणी मिरज तालुक्यातील उपलब्ध शिक्षकांना निवडणूक ड्युटी लावली आहे. आटपाडी तालुक्यात जत तालुक्यातील शिक्षकांची नियुक्ती केली आहे. - अशोक काकडे, जिल्हाधिकारी सांगली

English
हिंदी सारांश
Web Title : CTET Teachers Excused from Election Duty After Lokmat Report

Web Summary : Sangli excused 1,484 teachers from election duty due to CTET clash. Following a Lokmat report, the Election Commission directed districts to exempt teachers taking the exam. District collectors are compiling data to relieve more teachers.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Maharashtraमहाराष्ट्रVotingमतदानTeacherशिक्षकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग