Exclusive: नरेंद्र मोदींच्या तुलनेत आज कुणीही नाही; संजय राऊतांची स्तुतिसुमनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 14:45 IST2020-01-15T14:44:15+5:302020-01-15T14:45:15+5:30

संजय राऊतांकडून मोदींचं तोंडभरुन कौतुक

exclusive he is a tall leader shiv sena mp sanjay raut praises pm narendra modi | Exclusive: नरेंद्र मोदींच्या तुलनेत आज कुणीही नाही; संजय राऊतांची स्तुतिसुमनं

Exclusive: नरेंद्र मोदींच्या तुलनेत आज कुणीही नाही; संजय राऊतांची स्तुतिसुमनं

पुणे: राज्यातल्या भाजपा नेत्यांना वारंवार लक्ष्य करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मात्र स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे. सध्या देशात नरेंद्र मोदींच्या तुलनेत कोणताही नेता नसल्याचे कौतुकोद्गार राऊत यांनी काढले. सध्याच्या घडीला मोदी हे देशातले सर्वाधिक लोकप्रिय नेते असून त्यांनी जगात देशाची प्रतिमा निर्माण केली असल्याचं राऊत यांनी म्हटलं. लोकमत पत्रकार पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी राऊत यांची मुलाखत घेतली. यावेळी लोकमत संपादकीय मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा व्यासपीठावर उपस्थित होते. 

Exclusive: आम्ही निकालाआधीच ठरवलं होतं; संजय राऊतांनी सांगितलं सरकार स्थापनेमागचं 'प्लॅनिंग'

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून भाजपाला लक्ष्य करणाऱ्या संजय राऊत यांनी आजही भाजपाचा समाचार घेतला. मुख्यमंत्रिपदाच्या शब्दावरुन त्यांनी भाजपावर पुन्हा एकदा टीका केली. 'अटलबिहारी वाजपेयी असल्यापासून माझं भाजपावर प्रेम आहे. नेते बदलतात, पिढी बदलते, तसे पक्षात हळूहळू बदल होत जातात,' असं म्हणत राऊत यांनी सध्याच्या भाजपावर अप्रत्यक्षपणे शरसंधान साधलं.

शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या; संजय राऊतांचं उदयनराजेंना प्रत्युत्तर 

भाजपानं दिलेला शब्द पाळला असता, तर आज राज्यात वेगळं चित्र दिसलं असतं, असं राऊत म्हणाले. पंतप्रधान मोदींनी राज्यातल्या सत्तास्थापनेत फारसं लक्ष घातलं असं वाटत नाही, असंदेखील त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं. सध्या देशात मोदींइतका लोकप्रिय नेता नाही. त्यांनी जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे, अशा शब्दांत राऊत यांनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळली. पंतप्रधान हा देशाचा असतो, तो कोणत्याही पक्षाचा नसतो, असंदेखील ते पुढे म्हणाले. 



शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातूनही काल पंतप्रधान मोदींचं कौतुक करण्यात आलं होतं. 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' या वादग्रस्त पुस्तकावरुन भाजपावर तोफ डागताना मोदींची मात्र स्तुती केली होती. मोदी हे कर्तबगार आणि लोकप्रिय नेते आहेत. देशाचे पंतप्रधान म्हणून आज त्यांना तोड नाही, अशा शब्दांत मोदींची प्रशंसा करण्यात आली होती. 

Web Title: exclusive he is a tall leader shiv sena mp sanjay raut praises pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.