Exclusive: अजित पवारांचे लोकेशन सापडले; सोबत खास सहकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 22:57 IST2019-09-27T22:31:43+5:302019-09-27T22:57:21+5:30

खुद्द शरद पवारांचीही त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. यामुळे साऱ्यांनाच अजितदादा कुठे आहेत याची उत्सुकता होती.

Exclusive: finally Ajit Pawar's location found; Special friends with them | Exclusive: अजित पवारांचे लोकेशन सापडले; सोबत खास सहकारी

Exclusive: अजित पवारांचे लोकेशन सापडले; सोबत खास सहकारी

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मोबाईल स्वीच ऑफ लागत होता. यामुळे ते नेमके कुठे आहेत याबाबत काहीच माहिती मिळत नव्हती. खुद्द शरद पवारांचीही त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. यामुळे साऱ्यांनाच अजितदादा कुठे आहेत याची उत्सुकता होती. अजित पवारांचे लोकेशन अखेर समजले आहे. 

शुक्रवारी रात्री उशिराने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अंबालिका कारखान्यावर दाखल झाले. त्यांच्या या कारखान्यावरील मुक्कामाबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.


पवार यांचे भागीदार असलेले वीरधवल जगदाळे हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. दिवसभराच्या घडामोडीनंतर पवार हे नॉटरिचेबल आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही अजित पवार यांनी संपर्क केलेला नाही. अजित पवार यांनी आज संध्याकाळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला. त्यांनी तो मंजूरही केला. त्याआधी दुपारी अजित पवार हे बारामती व पुणे परिसरात होते. त्यानंतर सायंकाळी ते अंबालिका कारखान्यावर आले. 

अजित पवार हे राज्य बँकेचे अध्यक्ष होते. या बँकेतील अनियमिततेमुळे शरद पवार यांच्यावर वयाच्या ८० व्या वर्षी ईडीने गुन्हा दाखल केला. यामुळे व्यथित होऊन त्यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांच्या या दौºयाबाबत कमालीची गोपनियता पाळण्यात आली आहे. आपले नेहमीचे वाहन बदलून ते या कारखान्यावर आल्याचे सूत्रांनी सांगितले.
 

Web Title: Exclusive: finally Ajit Pawar's location found; Special friends with them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.