शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

माजी संचालकांकडून १४७ कोटींची वसुली

By admin | Updated: October 27, 2015 01:53 IST

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४५ माजी संचालक व एका कार्यकारी संचालकांकडून १४७ कोटी रुपये वसूल करावेत, असे आदेश सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४५ माजी संचालक व एका कार्यकारी संचालकांकडून १४७ कोटी रुपये वसूल करावेत, असे आदेश सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिले. चौकशी अधिकारी सचिन रावळ यांनी ‘कलम ८८’ नुसार केलेली वसुलीची कारवाई कायम ठेवली आहे.सहकार विभागाने १३ नोव्हेंबर २००९ला बँकेवर प्रशासक नेमले. प्रशासकीय कामकाज सुरू असताना, बँकेच्या कारभाराची चौकशीही लावण्यात आली. त्यामध्ये विनातारण कोट्यवधी रुपयांचे कर्जवाटप, नियमबाह्य, अपुरे तारण कर्जवाटप व २००६-०७ या आर्थिक वर्षात बँक तोट्यात असताना, वाटप केलेला लाभांश आदींमुळे बँकेचे आर्थिक नुकसान झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. त्यानुसार चौकशी अधिकारी सचिन रावळ यांनी २३ जानेवारी २०१५ रोजी माजी संचालकांकडून १४७ कोटी वसुलीचा अहवाल विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांच्याकडे सादर केला होता. दराडे यांनी माजी संचालकांना वसुलीच्या नोटिसा लागू केल्या होत्या. या नोटिसांविरोधात माजी संचालकांंनी न्यायालयात धाव घेतली होती, तर काहींनी सहकार विभागाकडे दाद मागितली होती. माजी संचालकांना निवडणूक लढविण्यास परवानगी देऊन सुनावणी सहकारमंत्र्यांसमोर करावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार गेले महिनाभर सहकारमंत्री पाटील यांच्यासमोर माजी संचालकांची सुनावणी पूर्ण झाली होती. या सुनावणीवर सोमवारी मंत्री पाटील यांनी निकाल दिला. माजी संचालकांनी स्वत:च्या मालमत्तेचे वर्णन सहकार खात्याकडे यापूर्वीच सादर केले असल्याने, वसुलीचा मार्ग सुकर होणार आहे. (प्रतिनिधी)