शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रजा घेऊ इच्छिणा-या पोलिसांना द्यावे लागणार पुरावे

By admin | Updated: April 28, 2016 05:22 IST

रजा घेऊ इच्छिणाऱ्या मुंबईतील पोलिसांना आता त्याबाबतचे सबळ पुरावे वरिष्ठांना द्यावे लागणार आहेत. त्याशिवाय त्यांची रजा मंजूर केली जाणार नाही

मुंबई : विविध कारणांमुळे रजा घेऊ इच्छिणाऱ्या मुंबईतील पोलिसांना आता त्याबाबतचे सबळ पुरावे वरिष्ठांना द्यावे लागणार आहेत. त्याशिवाय त्यांची रजा मंजूर केली जाणार नाही, असे आदेश बजाविण्यात आलेले आहेत. गेल्या वर्षापासून पोलिसांना साप्ताहिक सुट्टीच्या बदल्यात एक दिवसाचा पूर्ण पगार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर, अपवादात्मक प्रसंगी त्यांना साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कामावर बोलाविले जाते. त्यामागे पोलिसांना आराम मिळण्याबरोबरच, त्यांना द्यावा लागणारा मोबदला वाचविण्याच्याही दृष्टिकोन आहे. मात्र, त्याचबरोबर अधिकारी व अंमलदारांकडून अर्जित व धनार्जित रजा म्हणजेच मंजूर व पगारी रजा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी संबंधित परिमंडळ, घटकातील अप्पर आयुक्त व उपायुक्तांची मंजुरी घेणे आवश्यक असते. त्यामुळे त्या विभागाकडे अर्ज पाठविला जातो. त्यामध्ये विवाह, घरबांधणी/खरेदी, व्याधींवर उपचार अशी कारणे दिली जातात. त्या अनुषंगाने कसलाही पुरावा सादर केला जात नाही. त्यासंबंधी योग्य खातरजमा करून रजेला मंजुरी द्यावी, अशी सूचना आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली आहे. त्यानुसार, दक्षिण प्रादेशिक विभागात त्यांची अंमलबजावणी केली जात आहे. (प्रतिनिधी) असे लागतील पुरावे...रजेला मंजुरी मिळविण्यासाठी जे कारण दिले आहे. त्यानुषंगाने त्यासंबंधी पुरावे सादर करावे लागतील. उदाहरणार्थ, जर लग्नाचे कारण देऊन एखाद्या अधिकारी/कर्मचाऱ्याने रजेची मागणी केल्यास, त्याला लग्नपत्रिका अर्जासोबत जोडावी लागेल. घरखरेदीबाबतचा व्यवहार करावयाचा असल्यास, त्यासंबंधी कागदोपत्री पुरावा सादर करावा लागणार आहे. च्पुराव्याविना मंजुरीसाठी पाठविलेले रजेचे सर्व अर्ज संबंधित पोलीस ठाणे/शाखेत पाठविण्यात आले आहेत. त्याच्यासोबत पुरावा जोडून ते पुन्हा सादर करण्याच्या सूचना अप्पर आयुक्त प्रताप दिघावकर यांनी अधिकारी व अंमलदारांना केली आहे.