शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी बिडीचे नाव बदलणार!शिवप्रेमी संघटना आणि जनतेच्या वाढत्या दबावापुढे साबळे-वाघिरे कंपनी झुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 19:26 IST

विविध शिवप्रेमी संघटनांनी विडीचे नाव बदलण्यासाठी साबळे-वाघिरे कंपनीवर मोठ्या प्रमाणात दबाव आणला होता.

ठळक मुद्देआम्ही आमच्या उत्पादनाचे नाव बदलण्याचे निश्चित केले आहे. मात्र त्यासाठी थोडा वेळ लागणार

पुणे : छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बिडी विक्रीस आणल्यानंतर संभाजी ब्रिगेड, शिवधर्म फाउंडेशन, व इतर शिवप्रेमी संघटना व जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता.तसेच बिडीचे नाव बदलण्यासाठी पुरंदरच्या पायथ्याशी आंदोलन करून सासवड पोलीस ठाण्यात साबळे-वाघिरे कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिवसेंदिवस विडीवरचे संभाजी महाराजांचे नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागली होती. वाढता रोष व शंभूप्रेमी संघटना व लोकभावनेचा आदर करून अखेर कंपनीने संभाजी बिडीचे नाव बदलण्यात येणार निश्चित केले आहे, अशी माहिती साबळे आणि वाघिरे कंपनीचे संचालक संजय साबळे यांनी दिली आहे. 

बिडीला देण्यात आलेल्या संभाजी महाराजांचे नाव बदलण्यासाठी खासदार डॉ.अमोल कोल्हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले होते. आमदार नितेश राणे, आमदार रोहित पवार यांनी ट्विटरद्वारे बिडीला संभाजी महाराजांचे नाव वापरण्यावर जोरदार आक्षेप नोंदवला होता. तसेच विविध संघटनांनी नाव बदलण्यासाठी साबळे-वाघिरे कंपनीवर मोठ्या प्रमाणात दबाव आणला होता.त्यामुळे ह्या कंपनीने अखेर नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 

याविषयी संजय साबळे म्हणाले, आम्ही आमच्या उत्पादनाचे नाव बदलण्याचे निश्चित केले आहे. मात्र त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. जी काही चार ते पाच नावे आमच्याकडे आली आहे त्यापैकी एका नावाची लवकरात लवकर नोंदणी करून उत्पादन आणि विक्री सुरू करण्यात येईल. आम्ही वेळोवेळी शिवप्रेमींच्या भावनांचा आदर केला आहे. मात्र, आमचा बिडी निर्मितीचा व्यवसाय हा ९० वर्षांहून अधिक जुना आहे. तसेच या व्यवसायावर ६० ते ७० हजार कामगारांचा प्रपंच सुरू आहे. त्यामुळे तडकाफडकी उत्पादन व विक्री थांबवली तर त्या कुटुंबांना खूप मोठा फटका बसेल तसेच कंपनीचेही अतोनात नुकसान होईल. त्यामुळे आम्ही बिडीचे नाव बदलणार आहोत फक्त शिवप्रेमी संघटनांनी थोडे सहकार्य करावे असेही संजय साबळे यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Puneपुणेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीState Governmentराज्य सरकारNitesh Raneनीतेश राणे Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेRohit Pawarरोहित पवार