शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

चर्चेआधीच मविआत जागा वाटपावरून तिढा; संजय राऊत यांच्या विधानावरून कलगीतुरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 06:34 IST

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अजून काहीही ठरलेले नाही. चर्चादेखील सुरू झालेली नाही. अशावेळी कोणीही असली विधाने करू नयेत.

मुंबई : महायुतीमध्ये लोकसभेच्या ४८ पैकी गेल्यावेळी जिंकलेल्या १८ जागा आमची शिवसेनाच पुन्हा लढणार, असे विधान ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी केल्यानंतर महाविकास आघाडीत परत एकदा वादाची ठिणगी पडली आहे.

गेल्यावेळी आमच्या १९ जागा (राज्यातील १८) निवडून आल्या होत्या. त्या आमच्याकडेच राहतील. राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या आणि काँग्रेसने एक. जागावाटपात त्यावर कशी चर्चा होणार? त्या त्यांच्याकडेच राहतील, असे राऊत यांनी नांदेडमध्ये पत्रकारांना सांगितले. महाविकास आघाडी एकत्रितच लढेल, असे ते म्हणाले.

असली विधाने करू नयेत : पटाेलेकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अजून काहीही ठरलेले नाही. चर्चादेखील सुरू झालेली नाही. अशावेळी कोणीही असली विधाने करू नयेत. भाजपला हरविण्यासाठी जागा केवळ लढणे नाही, तर जिंकणे महत्त्वाचे आहे. मविआच्या रणनीतीवर परिणाम होईल असे कोणीही बोलू नये, असे पटोले मुंबईत म्हणाले.

मविआत अस्थिरता : आंबेडकरईडी व नाबार्डच्या चौकशीखाली असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी भाजप राजकारण करेल. तेथे काय गेम होतो, ते खूप महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादीचे काही लोक स्वेच्छानिवृत्ती घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोवर राष्ट्रवादी सेटल होत नाही, तोवर आघाडीचे जागावाटप शक्य नाही. कर्नाटकच्या निकालानंतर नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा सुरू केली आहे. त्यामुळे मविआत अस्थितरता दिसते, असे निरीक्षण वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नोंदविले.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीSanjay Rautसंजय राऊतNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाShiv Senaशिवसेना