शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मराठी पाऊल पडते पुढे! Shark Tank India मधील Startup ची आदित्य ठाकरेंकडून दखल, दिली ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 7:04 PM

नाशिकमधल्या स्टार्टअप कंपनीला आदित्य ठाकरेंनी दिली भेट

सध्या सोनी टीव्ही (Sony TV) वर येणारा कार्यक्रम शार्क टँक इंडिया (Shark Tank India) हा अतिशय लोकप्रिय झालाय. यामध्ये असलेले जज म्हणजेच शार्क्स अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करून स्टार्टअप मोठं करण्यासाठी मदत करत आहेत. शार्क टँक इंडियामध्ये आलेल्या नाशिकमधील इलेक्ट्रीक बाईक तयार करणाऱ्या कंपनीची पर्यायवर मंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी २८ जानेवारी रोजी रिव्हॅम्प या कंपनीच्या कारखान्याला भेट दिली.

आदित्य ठाकरे हे बऱ्याच कालावधीपासून राज्याच्या इलेक्ट्रीक व्हेईकल धोरणासाठी काम करत आहेत. तसंच त्यांनी नुकतंच मुंबईत ९०० इलेक्ट्रीक एसी डबलडेकर बसेस आणण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्यांनी शार्क टँक इंडियामध्ये आलेल्या नाशिकच्या स्टार्टअप कंपनीला भेट दिली. शार्क टँक इंडियाच्या एका क्लिपमध्ये आपल्याला याची माहिती मिळाली आणि ही कंपनी भारतीय बनावटीच्या बाईक्सचं उत्पादन करते, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलंय. "काही दिवसांपूर्वीच मला शार्क टँक इंडियाच्या एका क्लिपमध्ये नाशिकमधील रिव्हॅम्प या पूर्णपणे भारतीय बनावटीच्या इलेक्ट्रीक बाईक्स तयार करणाऱ्या कंपनीबद्दल समजलं. नाशिकमध्ये असताना या यंग टीमची मी भेट घेतली. या कंपनीकडून उत्पादन घेतल्या जात असलेल्या इलेक्ट्रीक गाज्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि इलेक्ट्रीक गाड्यांचा वापर करण्यासाठी आपण एमआयडीसीसोबत कसं काम करु शकतो यासंदर्भात या टीमशी चर्चा केली," असं आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. यासोबतच त्यांनी रिव्हॅम्पच्या टीमसोबत फोटोही शेअर केलाय. शिवाय कंपनीनंही आदित्य ठाकरे यांचे आभार मानलेत.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरNashikनाशिक