Sharad Pawar on Devendra Fhadnavis: फडणवीसांच्या टीकेचा आनंद घेतोय; शरद पवारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 06:08 IST2022-04-16T06:08:10+5:302022-04-16T06:08:37+5:30
बाबासाहेब पुरंदरे यांनी पत्रव्यवहार करीत नंतर माफी मागितली होती. त्यामुळे या विषयावर आणखी वाद वाढू नये, अशी आपली इच्छा आहे, असे पवार म्हणाले.

Sharad Pawar on Devendra Fhadnavis: फडणवीसांच्या टीकेचा आनंद घेतोय; शरद पवारांचा टोला
जळगाव :
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला जातीयवादी का म्हटले याबाबत माहीत नाही. मात्र, सध्या त्यांच्या टीकेचा आनंद घेत असल्याची मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगावात केली.
जेम्स लेन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केले आहे. मात्र, हेच जेम्स लेन हे चांगले शिवअभ्यासक असल्याचे कौतुक बाबासाहेब पुरंदरे यांनी केले होते. त्यासोबतच शिवजयंती केव्हा साजरी करावी यावरूनदेखील बाबासाहेब पुरंदरे यांनी पत्रव्यवहार करीत नंतर माफी मागितली होती. त्यामुळे या विषयावर आणखी वाद वाढू नये, अशी आपली इच्छा आहे, असे पवार म्हणाले.
सध्या सामाजिक ऐक्य धोक्यात येत असल्याचे दिसत आहे. जे लोक प्रत्यक्ष सत्तेत नाहीत किंवा त्यांना कोणतेही अधिकार नाहीत, अशी काही मंडळी अन्य लोकांच्या मूलभूत अधिकारावर गडांतर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
- शरद पवार