अकोला : राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सर्वांसमक्ष पाणउतारा करत एखाद्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी सरकारकडे अर्ज केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, डॉ. पाटील यांनी हे आरोप फेटाळले आहेत.१२ फेब्रुवारी रोजी झालेल्या जनता दरबारामध्ये गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने काढलेली निविदा मंजूर करण्यासाठी आपल्यावर दबाव आणला. तसेच, अशा प्रकारे निविदा मंजूर करणे नियमबाह्य असल्याचे आपण निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी अतिशय अपमानास्पद व असंसदीय भाषा वापरून आपला अपमान केला. एखाद्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप जि.प.चे अति. कार्यकारी अधिकारी सुभाष पवार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ग्रामविकास व जलसंधारण खात्याच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून स्वेच्छा निवृत्ती घेत असल्याचे कळविले आहे.अकोला जिल्हा परिषदेच्या संदर्भातील तक्रारींचा निपटारा होण्याचे काम अतिशय कमी आहे. त्यामुळे निर्देशांचे अनुपालन का होत नाही, याबाबत अधिकाºयांना जाब विचारला. नाराजी व्यक्त केली. हे सर्व जिल्हाधिकारी व इतर अधिकाºयांच्या समक्ष घडले आहे. त्यामुळे सुभाष पवार यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.- डॉ. रणजीत पाटील, गृहराज्यमंत्री
राज्यमंत्र्यांच्या दबावामुळे अधिका-याची निवृत्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 02:11 IST