कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात व्यवस्थापकास पडली महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 10:39 AM2022-02-25T10:39:39+5:302022-02-25T10:39:49+5:30

वसुलीबाबत परस्पर निर्णय घेणाऱ्या व्यवस्थापकांना महामंडळाने दणका देत निलंबित केले.  

Employee pay cuts cost managers dearly st strike maharashtra | कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात व्यवस्थापकास पडली महागात

कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात व्यवस्थापकास पडली महागात

Next

मुंबई : एस.टी. कामगारांच्या संपामुळे एस.टी. महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. मात्र, ही नुकसानभरपाई कामगारांच्या वेतनात कपात करून वसूल करण्याचा कोणताही निर्णय प्रशासनाने घेतला नसतानाही तसे करण्याचा निर्णय अकोले येथील एका आगार व्यवस्थापकाला चांगलाच भारी पडला आहे. त्याला एस.टी. महामंडळाने  निलंबित केले आहे.

अकोले जिल्ह्यातील कारंजा आगारातील संपात सहभागी झालेल्या २४ एस.टी. कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करताना संप काळात झालेल्या उत्पन्नाच्या नुकसानीची भरपाई करण्याबाबत आरोपपत्रात नमूद केले आहे. त्याची  गंभीर दखल घेत वसुलीबाबत परस्पर निर्णय घेणाऱ्या कारंजा आगाराचे व्यवस्थापक मुकुंद न्हावकर यांना महामंडळाने दणका देत निलंबित केले.  

२४ कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र 
कारंजा आगारातील सहभागी झालेल्या कामगारांविरोधात खात्यामार्फत कारवाई सुरू आहे. ही कारवाई करताना संपामुळे आगाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्याच्या भरपाईपोटी आपल्याकडून ७ ते ८ लाख रुपये का वसूल करू नये, असा उल्लेख करत आगाराचे व्यवस्थापक मुकुंद न्हावकर यांनी २४ संपकरी कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र दाखल केले. पण संपामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कामगारांकडून करण्याचा निर्णय महामंडळाने घेतलेला नाही. अशात न्हावकर यांच्या या बेजबाबदारपणाची महामंडळाने गंभीर दखल घेत सध्या सुरू असलेल्या संपास चिथावणी देण्याचा प्रकार असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. 

Web Title: Employee pay cuts cost managers dearly st strike maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.