शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

आपत्कालीन बटन व ट्रॅकिंग उपकरण प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांना उद्यापासून बंधनकारक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 8:52 PM

रिक्षा वगळून प्रवासी वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांना नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून ‘लोकेशन ट्रॅकिंग उपकरण’ व आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ठळक मुद्देअधिसुचनेनुसार केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १२५ मध्ये या उपकरणांचा समावेशनवीन टॅक्सी, बस, मिनी बस, स्कुल बस व इतर प्रवासी वाहनांचा त्यामध्ये समावेश नियंत्रण कक्षच अस्तित्वात नाहीपोलिसांना संबंधित वाहन पकडणे, अडचणीत सापडलेल्या महिलांना वाचविणे सहज शक्य होणार

पुणे : रिक्षा वगळून प्रवासी वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांना नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून ‘लोकेशन ट्रॅकिंग उपकरण’ व आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही उपकरणे नसल्यास नवीन वाहनांची नोंदणी केली जाणार नाही, असे प्रादेशिक परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. वाहनांमधील प्रवासी प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने केंद्रीय परिवहन विभागाने प्रवासी वाहनांमध्ये ‘लोकेशन ट्रॅकिंग उपकरण’ व आपत्कालीन बटन बसविण्याबाबत नोव्हेंबर २०१६ मध्ये अधिसुचना काढलली होती. या अधिसुचनेनुसार केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १२५ मध्ये या उपकरणांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी दि. १ जानेवारी २०१९ पासून केली जाणार असल्याचे शासनाकडून त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार सर्व वाहन उत्पादक, विक्रेत्यांना याबाबत सुचित करण्यात आले होते. त्यानुसार मंगळवार (दि. १) पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली.दुचाकी, ई-रिक्षा, रिक्षा तसेच इतर तीनचाकी वाहने आणि ज्या वाहनांना परवाना लागू नाही, अशी वाहने वगळुन सर्व नव्याने नोंदणी होणाºया सार्वजनिक सेवा वाहनांमध्ये ही उपकरणे बसविणे आवश्यक आहे. नवीन टॅक्सी, बस, मिनी बस, स्कुल बस व इतर प्रवासी वाहनांचा त्यामध्ये समावेश आहे. ही उपकरणे असल्याशिवाय वाहनांची नोंदणी होणार नसल्याचे आजरी यांनी स्पष्ट केले. -------------नियंत्रण कक्षच अस्तित्वात नाही प्रवासी वाहनांमध्ये आपत्त्कालीन बटन व ट्रॅकिंग उपकरण बसविणे बंधनकारक करण्यात आले असले तरी अद्याप नियंत्रण कक्षच स्थापन करण्यात आलेला नाही. त्यामुळे मंगळवारपासून आपत्कालीन बटन असलेली वाहने रस्त्यावर आली तरी त्यावर कुणाचेच नियंत्रण राहणार नसल्याने त्याचा काहीच उपयोग होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.महिलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने केंद्र सरकारकडून विविध पातळ््यांवर प्रयत्न केले जात आहेत. वाहनांच्या नंबर प्लेटपासून वाहनांमध्ये आपत्कालीन बटन बसविणे, चाईल्ड लॉकची सुविधा नसणे असे विविध निर्णय घेतले जात आहेत. त्यापैकी आपत्कालीन बटन व लोकेशन ट्रॅकिंग उपकरणे बसविणे मंगळवार (दि. १) पासून बंधनकारक करण्यात आले आहे. रिक्षा व इतर तीन चाकी वाहने वगळून परवाना आवश्यक असलेल्या वाहनांमध्ये ही उपकरणे असल्याशिवाय नोंदणी होणार नाही. पण हे बंधन घालताना शासन या उपकरणांचे नियंत्रण कुणाकडे असेल, याबाबतचा निर्णय घेणे विसल्याचे दिसते.प्रादेशिक परिवहन विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी वाहनांमधून महिला प्रवास करताना काही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्यास आपत्कालीन बटन दावू शकते. हे बटन दाबल्यानंतर ते नियंत्रण कक्षाला लगेच कळणार आहे. कक्षाकडे लगेचच वाहनाची सर्व माहिती तसेच त्याचे सध्याचे ठिकाण समजेल. त्यानुसार स्थानिक पोलिसांना ही माहिती दिली जाईल. त्यानंतर पोलिसांना संबंधित वाहन पकडणे, अडचणी सापडलेल्या महिलांना वाचविणे सहज शक्य होणार आहे. पण या उपकरणांचे नियंत्रण कुणाकडे असेल, नियंत्रण कक्ष कुठे असेल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाकडून एकत्रितपणे हा नियंत्रण कक्ष उभारला जाऊ शकतो. तसेच स्थानिक किंवा राज्य पातळीवरही कक्ष असू शकतो. पण अद्याप याबाबत शासनाकडून काहीच माहिती देण्यात आली नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसGovernmentसरकारPoliceपोलिस