Elgar Parishad case State Government Has Right Of Parallel Probe says ncp chief sharad pawar | एल्गार प्रकरणात मागच्या सरकारनं जे केलं, ते लोकांसमोर यायला हवं- शरद पवार

एल्गार प्रकरणात मागच्या सरकारनं जे केलं, ते लोकांसमोर यायला हवं- शरद पवार

ठळक मुद्देएल्गार आणि कोरेगाव-भीमा वेगळी प्रकरणं- शरद पवारएल्गार प्रकरणाचा समांतर तपास करण्याचा राज्य सरकारला अधिकार- शरद पवारमागच्या सरकारनं काय केलं, ते जनतेसमोर यायला हवं- शरद पवार

मुंबई: एल्गार परिषद प्रकरणात अनेकांना विनाकारण गोवण्यात आलं आहे. तिथं उपस्थित नसलेल्यांवरदेखील गुन्हे दाखल करण्यात आले. मागच्या सरकारनं त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला. यात त्यांना काही पोलिसांनीदेखील साथ दिली. त्यामुळे या प्रकरणात आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या पोलिसांची चौकशी व्हायलाच हवी. तसा अधिकार राज्य सरकारला आहे. एल्गार प्रकरणात मागच्या सरकारनं जे केलं, ते लोकांसमोर यायला हवं, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.एल्गार परिषद प्रकरणाचा तपास केंद्र सरकारला देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं समांतर चौकशीची भूमिका घेतली. त्यासाठी गृहखात्याच्या अखत्यारित स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काल झालेल्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही त्यास अनुकूलता दर्शवली. या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि एल्गार प्रकरणावर भाष्य केलं. 

कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद ही दोन्ही प्रकरणं वेगळी असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं. एल्गार परिषदेचा कोरेगाव-भीमाशी संबंध जोडण्यात आला. त्या परिषदेला हजर नसलेल्या लोकांना या प्रकरणात अडकवण्यात आलं. त्यांच्यावर खटले भरून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं. यात काही पोलिसांचाही हात होता. काही सरकारी अधिकारीदेखील यात सहभागी होते, त्यांच्याबद्दल आमची तक्रार आहे. त्यामुळे एल्गार प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असा आमचा आग्रह आहे. तशी चौकशी झाल्यास सत्तेचा गैरवापर करणारे उघडे पडतील,' असं पवार म्हणाले. 

आजच्या महत्त्वाच्या बातम्या

शिवसेना बदलली?... 'नाणार'च्या सामनातील जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचं 'रोखठोक' विधान

मेट्रो कारशेड आरेमधून रॉयल पार्ममध्ये जाणार? प्रकल्प हलवण्याच्या हालचाली सुरू

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी ४५ कुटुंबांना घरं रिकामी करण्याचे आदेश

China Coronavirus : धक्कादायक! चीनच्या प्रयोगशाळेमध्ये कोरोना व्हायरसची निर्मिती?

Web Title: Elgar Parishad case State Government Has Right Of Parallel Probe says ncp chief sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.