शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

केंद्राकडून एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे; केंद्राची राज्य सरकारवर कुरघोडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 22:01 IST

एल्गार प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा करणार

मुंबई: एल्गार परिषदेचा तपास केंद्राकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवला आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. या प्रकरणाचा आढावा राज्य सरकारकडून घेतला जात असताना केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. कोरेगाव-भीमामधील हिंसाचार तत्कालीन राज्य सरकारनं पोलिसांच्या मदतीनं घडवला. त्यामुळे या प्रकरणाची कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटीद्वारे चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली. याचा आढावा राज्य सरकारकडून घेण्यात येत असताना केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोदी सरकारनं शरद पवारांवर कुरघोडी केल्याचं बोललं जात आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केली. राज्य सरकारला विश्वासात घेता मोदी सरकारनं भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारची ही कृती राज्य सरकारच्या अधिकारांवर अतिक्रमण करणारी आहे. हा संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली. तत्कालीन फडणवीस सरकारच्या चुका समोर येऊ नये, यासाठीच मोदी सरकारनं हा तपास एनआयएकडे दिला, असा आरोप त्यांनी केला. भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास इतके महिने राज्यातल्या यंत्रणा करत होत्या. मग सरकार बदलल्यानंतर अचानक हा तपास केंद्रानं स्वत:कडे घेण्याची गरज काय, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. या प्रकरणी प्रतिक्रिया देताना माजी मंत्री आणि भाजपा नेते विनोद तावडेंनी मोदी सरकारचं समर्थन केलं. एनआयए भाजपाची संस्था नाही. त्यामुळे विरोधकांनी घाबरण्याचं काहीच कारण नाही, असं म्हणत तावडेंनी विरोधकांवर पलटवार केला. 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा