शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयात विजेची उधळपट्टी

By admin | Updated: July 22, 2014 01:21 IST

महापालिकेच्या मुख्यालयास मॉलचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याठिकाणी विजेची उधळपट्टी सुरू आहे.

नामदेव मोरे - नवी मुंबई
महापालिकेच्या मुख्यालयास मॉलचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याठिकाणी विजेची उधळपट्टी सुरू आहे. 3 महिन्यांत तब्बल 71 लाख 5क् हजार रूपये वीज बिल आले असून वातानुकूलित यंत्रणोच्या अट्टहासासाठी जनतेचा पैसा फुकट जात आहे. 
नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय शहरातील लँडमार्क म्हणून ओळखले जावू लागले आहे.  इमारत दिसायला अत्यंत आकर्षक असली तरी प्रशासकीय कामकाजासाठी मात्र गैरसोयीची होऊ लागली आहे. जनतेने कररूपाने दिलेल्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे.  सेंट्रल एसी बसविण्यात आल्याने  येथे आले की मॉलमध्ये आल्याचा भास होत आहे. वातानुकूलित यंत्रणोच्या या अट्टाहासामुळे विजेचे बिल लाखांच्या घरात जात आहे. जुन्या मुख्यालयात महिन्याला दोन ते अडीच लाख रूपये बिल येत होते. परंतु नवीन मुख्यालयामध्ये एप्रिल महिन्यात 3क् लाख, मेमध्ये 14 लाख व जूनमध्ये तब्बल 27 लाख 5क् हजार रूपये वीज बिल आले आहे. 8क् टक्के वीज  वातानुकूलित यंत्रणोवर खर्च होत आहे. 
जुन्या मुख्यालयात वर्षाला जवळपास 25 लाख रूपये वीजबिलावर खर्च होत होते. नवीन मुख्यालयात तो खर्च महिन्याला होत आहे. तीन महिन्यांत तब्बल 71 लाख रूपये बिल आल्यामुळे सर्वाचे डोळे विस्फारले आहेत. वास्तविक सरकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये कमी जागेचा जास्तीतजास्त वापर होणो आवश्यक असते. वीज, पाणी सर्वाचीच बचत करणो आवश्यक आहे. हजारो कोटी रूपयांचा बँक बलन्स असणारी सिडको, मिनी मंत्रलय असणारे कोकणभवन येथे कार्यालयांमध्ये पुरेसा नैसर्गिक प्रकाश येईल याची काळजी घेतली  आहे. परंतु पालिकेने मात्र सूर्यप्रकाश इमारतीमध्ये येईल अशी सोयच केलेली नाही. मॉलप्रमाणो बांधकाम केल्यामुळे देखभालीवर महिन्याला जनतेने कररूपाने जमा केलेले लाखो रूपये फुकट जात आहेत. 
 
नियोजन चुकले
इमारतीचे बांधकाम करताना पुरेसा सूर्यप्रकाश इमारतीमध्ये येईल याची काळजी घेण्यात आलेली नाही. भिंतीच्या बाजूला अधिकारी व पदाधिका:यांची दालने तयार केली आहेत. यामुळे कर्मचारी जिथे बसतात तेथे वीजपुरवठय़ाशिवाय प्रकाशच येवू शकत नाही अशी स्थिती आहे. वातानुकूलित यंत्रणोची कर्मचा:यांना उबग आली असून अनेकजण मोकळा श्वास घेता यावा यासाठी कार्यालयाबाहेर फेरफटका मारत आहेत. 
 
मुख्यालयात विजेची बचत करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. मोकळ्या जागेमध्ये वातानुकूलित यंत्र बंद करण्यात येत आहे. इमारतीमधील झुंबरातील बल्बही बंद ठेवले आहेत. जिथे शक्य आहे तेथे विजेचा वापर कमी करण्यात येत आहे. 
- जी. व्ही. राव,  सहशहर अभियंता, महापालिका 
 
जनतेर्पयत 
चुकीचा संदेश
शहरात पाणी, वीज जपून वापरण्याचे आवाहन करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणो आवश्यक आहे. परंतु पालिकेने मुख्यालयात विजेची उधळपट्टी सुरू केली असून त्यामुळे जनतेर्पयत चुकीचा संदेश जात आहे.