शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

विधान परिषदेच्या ६ जागांची २१ मे रोजी होणार निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:07 AM

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठीची निवडणूक २१ मे रोजी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी ही घोषणा केली.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठीची निवडणूक २१ मे रोजी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी ही घोषणा केली.ज्या सहा जागांची निवडणूक होत आहे त्या अशा (कंसात विद्यमान आमदार आणि त्यांचे पक्ष) रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग (अनिल तटकरे -राष्ट्रवादी), नाशिक (जयंत जाधव-राष्ट्रवादी), उस्मानाबाद-लातूर-बीड (दिलीपराव देशमुख-काँग्रेस), परभणी-हिंगोली (बाबा जानी दुर्रानी-राष्ट्रवादी), अमरावती (प्रवीण पोटे-भाजपा) आणि चंद्रपूर (मितेश भांगडिया-भाजपा). राष्ट्रवादीकडे ३, भाजपाकडे २, काँग्रेसकडे १ जागा आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांचे सदस्य आणि पंचायत समित्यांचे सभापती हे या निवडणुकीत मतदार असतात.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीत चांगलेयश मिळाल्याने भाजपाची मतदारसंख्या वाढली आहे. मित्रपक्ष शिवसेनेने साथ दिली तर दोघांनाही फायदा होईल.भाजपाचा विचार करता उस्मानाबाद-लातूर-बीडची जागा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची असेल. तीन जागा टिकविण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोरराहील.काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपा-शिवसेना अशी आघाडी/युती झाली आणि मतदार पक्षाशी प्रामाणिक राहिले तर तुल्यबळ लढती होतील. स्वबळावर जागा जिंकणे प्रत्येक पक्षाला कठीण जाणार आहे. लातूर-बीड-उस्मानाबादमध्ये भाजपाची २४७ व शिवसेनेची ५१ अशी २९८ तर काँग्रेसची १४१ व राष्ट्रवादीची २५१ अशी ३९२ मते आहेत. परभणी-हिंगोलीत भाजपाची ५१ व शिवसेनेची ९९ अशी १५० मते आहेत. राष्ट्रवादीकडे १५९ आणि काँग्रेसकडे १३१ अशी २९० मते आहेत.नाशिकमध्ये शिवसेनेकडे १८८, भाजपाकडे १५५ अशी तब्बल ३४३ मते आहेत तर राष्ट्रवादी ८९ आणि काँग्रेस ७३ मिळून आघाडीचे संख्याबळ १६२ इतकेच आहे. चंद्रपूरमध्ये भाजपाकडे तब्बल ४८३, शिवसेनेकडे ४५ अशी दोघांची मिळून ५२८ मते आहेत. त्या मानाने काँग्रेसकडे २४९ आणि राष्ट्रवादीकडे ७१ अशी ३२० मते आहे. ही निवडणूक एकतर्फी होऊ शकते.रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेची २४७ आणि भाजपाची १३५ मिळून ३८२ मते आहेत. राष्ट्रवादीकडे १५५, काँग्रेसकडे१३३ अशी २८८ मते आहेत. कोकणच्या या एका जागेसाठी खा. नारायण राणे आणि शेकापचे आ. जयंत पाटील यांची भूमिकाही महत्त्वाची असेल.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषद