"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 13:12 IST2025-11-22T13:11:25+5:302025-11-22T13:12:47+5:30

Local Body Election: सत्तेच्या बळावर दबाव टाकून निवडणुका बिनविरोध करून सत्ताधारी पाठ थोपटून घेत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 

"Elections are being held unopposed in the state by trampling on democracy and threatening it," says Congress | "लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका

"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका

नागपूर - राज्यात अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांचे नातेवाईक त्यात बायको, वहिनी,मामे भाऊ, दीर,बहिण,मुलगा बिनविरोध निवडणूक जिंकून आले आहेत,अनेक ठिकाणी गुलाल उधळला इथे लोकशाही पायदळी तुडवण्यात आली आहे. सत्तेच्या बळावर दबाव टाकून निवडणुका बिनविरोध करून सत्ताधारी पाठ थोपटून घेत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 

नागपूर इथे माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सत्ता महायुतीची असल्याने संपूर्ण यंत्रणा वापरली जाते आहे. कुठे पैशाचे प्रलोभन दाखवून कुठे पोलिस बळ वापरून निवडणुका बिनविरोध केलेल्या आहेत . दादागिरी, गुंडगिरी करून सत्ताधाऱ्यांचे नातेवाईक बिनविरोध निवडून आले आहेत .त्यामुळे जिथे निवडणुका होतील तिथे निवडणुका पारदर्शक होतील का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. एके ठिकाणी प्रचार तर भाजपची महिला उमेदवार थेट सांगत आहे मतदान करा नाहीत गाठ माझ्याशी आहे,निधी देणार नाही,विकास होणार नाही,मुख्यमंत्री भाजपचा असल्याने पदाधिकाऱ्यांना पण जोर चढला आहे जनताच आता याबाबत ठरवेल, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटदारांनी पुन्हा एकदा काम बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. सरकार शेतकऱ्यांना पैसे देत नाही, कंत्राटदारांची एक लाख कोटीची बिल थकवली आहेत. त्यांना पैसे देत नाही पण निवडणुका आल्या म्हणून आपल्या आमदाराना द्यायला सरकारकडे पैसे आहेत. राज्य तर दिवाळखोरीकडे निघाले आहे पण सरकारची पण अकलेची दिवाळखोरी जास्त झाली आहे, अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली.

निवडणुका आल्या की भाजपचे सर्व्हे येतात. भाजपाला बहुमत मिळणार अशा बातम्या येतात. हे सर्व्हे भाजप करते. बातम्या पण भाजपच देते. लोकांना मूर्ख बनवण्याचे हे भाजपचे उद्योग आहेत. मुंबईत आता मतदार आयडी सापडले आहेत, जसे महाराष्ट्र आणि बिहार मध्ये केलं तश्याच मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकायची असेल. बॅलेटवर निवडणुका झाल्या की,  दूध का दूध होईल, खरे जनमत स्पष्ट होईल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Web Title : महाराष्ट्र में निर्विरोध चुनावों पर कांग्रेस का हमला, लोकतंत्र कुचला गया।

Web Summary : कांग्रेस ने महाराष्ट्र में निर्विरोध चुनावों की आलोचना करते हुए सत्तारूढ़ दलों पर सत्ता के दुरुपयोग का आरोप लगाया। विजय वडेट्टीवार ने विरोधियों पर दबाव बनाने और रिश्तेदारों का पक्ष लेने का आरोप लगाया। उन्होंने आगामी चुनावों में पारदर्शिता और राज्य की वित्तीय स्थिति पर भी चिंता जताई।

Web Title : Congress slams unopposed elections in Maharashtra, democracy trampled.

Web Summary : Congress criticizes unopposed elections in Maharashtra, alleging misuse of power by ruling parties. Vijay Wadettiwar accuses the government of pressuring opponents and favoring relatives. He also raised concerns about transparency in upcoming elections and the state's financial condition.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.