शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

सोलापुरात पोटनिवडणुकीचा धुरळा,  तर साताऱ्यात बेजबाबदारपणा नडतोय, ४० दिवसांत वाढले ५५ हजार रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 8:08 AM

सोलापूर शहरानंतर बार्शी, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यात रुग्णवाढ सुरू झाली. दरम्यान, मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली.

राजकुमार सारोळे - सोलापूर: २५ दिवसांच्या संचारबंदीनंतरही सोलापूर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम आहे. गेल्या ४० दिवसांत ५५ हजार ६२९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, १ हजार २३५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एप्रिल व मेमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आणि मृत्यू झाले आहेत. पहिल्या लाटेत सप्टेंबर २०२० मध्ये १५ हजार ३०९ रुग्ण आढळले होते. नवीन वर्षात एप्रिलमध्ये ३६ हजार २३६ रुग्ण तर ७४० जणांचा मृत्यू झाला. १० मेपर्यंत दहा दिवसांत १९ हजार ३८४ पॉझिटिव्ह तर ४९५ जणांचा मृत्यू झाला. मेमध्ये शहरातील रुग्ण कमी झाले आहेत; पण ग्रामीण भागातील लाट कायम आहे. ग्रामीणमध्ये दररोज सरासरी दोन हजार पॉझिटिव्ह व ४० जणांचा मृत्यू तर शहरात १८० पॉझिटिव्ह व १० जणांचा मृत्यू अशी स्थिती आहे. जिल्हा प्रशासनाने १५ एप्रिलपासून कडक लॉकडाऊन जाहीर केला असून तो १५ मेपर्यंत वाढविला आहे.पोटनिवडणुकीनंतर संसर्गसोलापूर शहरानंतर बार्शी, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यात रुग्णवाढ सुरू झाली. दरम्यान, मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यामुळे या तालुक्यांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली. राजकीय बैठका, नेत्यांचे दौरे, सभा यामुळे मंगळवेढा, पंढरपूर व बाजूच्या तालुक्यात संसर्ग वाढला. निवडणुकीनंतर या तालुक्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा या तालुक्यांत शेजारच्या जिल्ह्यातून लोक आल्याने संसर्ग वाढल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग कडक लॉकडाऊननंतरही कमी व्हायचे नाव घेत नाही. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीमुळे जो धुराळा उडाला त्याची बाधा सोलापूरकरांना झाली आहे. तर अपुरी यंत्रणा असतानाही प्रशासन जीव तोडून काम करीत असतानाही सातारकरांचा बेजबाबदारपणा नडतोय, असे चित्र आहे.

ग्रामीण भागात एप्रिल व मे महिन्यात काेरोनाचा संसर्ग वाढला,  पुणे, मुंबई व कर्नाटकातून आलेल्या लोकांमुळे सीमावर्ती तालुक्यात संसर्ग वेगाने पसरला. त्यानंतर पोटनिवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय बैठकांमुळे ही वाढ झाल्याचे दिसत आहे. - डाॅ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी, साेलापूर 

सातारा जिल्ह्यात प्रशासन विविध पातळ्यांवर कोरोनाचा सामना करत आहे; पण नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची खरी आवश्यकता आहे. शासन नियमांचे पालन करावे. तसेच गृहविलगीकरणातील बाधितांनी पूर्ण बरे होईपर्यंत बाहेर पडू नये.- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSolapurसोलापूरElectionनिवडणूकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरOxygen Cylinderऑक्सिजनState Governmentराज्य सरकार