पिंपरी : लोकसभा निवडणुकीत भाजपा व शिवसेना युतीच्या उमेदवारांना महाराष्ट्रातील विधानसभेच्या २२८ जागांवर मताधिक्य मिळाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत अनेक उलथापालथी होऊन युतीला २८८ पैकी २२० जागा मिळतील. त्यासाठी युतीच्या फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यातही एकत्र बसल्यानंतर बदल होऊ शकतो, असा दावा महसूल मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुका वेगळ्या आहेत. मतदार दोन्हीकडेही वेगळे मतदान करतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील यशाने हुरळून जाऊ नका. आगामी विधानसभेच्या तयारीला लागा, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. पुण्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर पाटील यांनी मंगळवारी पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या कार्यालयाला भेट दिली. विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, सभागृहनेते एकनाथ पवार आदी या वेळी उपस्थित होते.
विधानसभेची सप्टेंबरमध्ये आचारसंहिता, ऑक्टोबरमध्ये निवडणूक : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 16:36 IST
आगामी विधानसभा निवडणुकीत अनेक उलथापालथी होऊन युतीला २८८ पैकी २२० जागा मिळतील.
विधानसभेची सप्टेंबरमध्ये आचारसंहिता, ऑक्टोबरमध्ये निवडणूक : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भविष्यवाणी
ठळक मुद्दे युतीच्या फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यात बदलाचा संकेत पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर पाटील पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड भाजपाच्या कार्यालयात