शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्टीन पती-पत्नीचे समाजकार्य मोठे : पवार

By admin | Updated: August 24, 2016 01:25 IST

अंधकारमय आयुष्य असणाऱ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे कोणतेही सामाजिक काम सर्वश्रेष्ठ आहे.

बारामती : ‘‘अंधकारमय आयुष्य असणाऱ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे कोणतेही सामाजिक काम सर्वश्रेष्ठ आहे. बिल आॅस्टिन व टिन आॅस्टिन या दांपत्याने मागील २५ वर्षांत २० लाख लोकांचे, बालकांचे आयुष्य बदलले, हे फार मोठे समाजकार्य आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे,’’ असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच व स्टार की हिअरिंग फाउंडेशन यांच्या वतीने व येथील अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सहकार्यातून एक हजार विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल श्रवणयंत्रे बसविण्याचे अभियान दोन दिवस सुरू होते. शनिवारी (दि. २०) या अभियानाचा समारोप झाला. पवार म्हणाले, ‘‘मागील ३० ते ३५ वर्षांपासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने राज्यात विविध भागांत सामाजिक उपक्रम सुरू आहेत. ठाण्यापासून ते गडचिरोलीपर्यंत आदिवासी भागात सुरुवातीच्या काळात अपंगांसाठी काम झाले. सध्या १०० बहिरेपणा असलेल्या व्यक्तींमध्ये ७० टक्के प्रमाण हे बालकांचे आहे, हे दुर्दैव आहे. त्यामुळेच त्यांना योग्य वेळीच उपचार मिळणे गरजेचे आहे. या वेळी स्टार की फाउंडेशनच्या वतीने शरद पवार यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सुनंदा पवार यांनी आभार मानले. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राजेंद्र पवार, बिल आॅस्टिन, टिन आॅस्टिन, रोहित मिश्रा, के. पी. पाटील, सुनंदा पवार, सुनेत्रा पवार, नगराध्यक्ष योगेश जगताप, पंचायत समितीचे सभापती करण खलाटे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)