शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

Sanjay Raut: 'एकनाथ शिंदे कडवट शिवसैनिक, फसवणूक करुन आमदारांना घेऊन गेले', संजय राऊतांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 11:29 IST

Sanjat Raut: 'अनेक आमदारांना गुजरातला नेले, गुजरातचे प्रदेशाध्यक्ष त्यांची व्यवस्था करत आहेत. यातून हे षडयंत्र असल्याचे दिसत आहे.'

मुंबई: काल झालेल्या विधान परिषद निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे काही शिवसेना आमदारांना घेऊन गुजरातला गेल्याची चर्चा आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'अनेक आमदार वर्षावर'ते पुढे म्हणाले की, "काही आमदारांची नावे मीडियात आली, ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात आले. यात काही मंत्र्यांची नावेही होती. पण, ते सर्व वर्षावर आहेत. काही आमदारांशी संपर्क झाल्यावर समजले की, त्यांना या प्रकाराबद्दल काहीच माहिती नाही. त्यातील काही परत मुंबईकडे येत आहेत. तर काही सध्या सूरतमध्ये आहेत. त्यांची व्यवस्था गुजरात प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील करत आहेत. त्या आमदारांना तिकडेच का ठेवलं? यातून त्यांचे षडयंत्र दिसून येत आहे. फसवणूक करुन आमदारांना घेऊन गेले. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर आम्ही तुम्हाला अधिक माहिती देऊ," असंही ते म्हणाले.

संबंधित बातमी- 'राज्यात मध्यप्रदेश-राजस्थान पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न', संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

'गैरसमज दूर होतील'"एकनाथ शिंदे कालपर्यंत आमच्यासोबत होते. सेनेचे उमेदवार विजयी व्हावे, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत होते. ते आमचे जीवाभावाचे सहकारी आहेत, कडवत शिवसैनिक आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत जे बोलले जात आहे, ते चुकीचं आहे. जोपर्यंत त्यांच्याशी बोलणं होत नाही, तोपर्यंत मी यावर काही बोलणार नाही. मुख्यमंत्री अनेक खात्यांचा आढावा घेत असतात. पण, तरीदेखील काही गैरसमज झाले असतील, तर ते दूर होतील. आमचे सर्व सहकारी यावर बोलत आहोत, सर्वांशी चर्चा सुरू आहे. राजकारणात अशा प्रसंगांना सामोरे जावं लागतं. 

'एकनाथ शिंदे कडवट शिवसैनिक'"अडीच वर्षांपूर्वी भाजपने अशाप्रकारचा प्रयत्न केला होता. आताही भाजप पाठीवर घाव घालत आहे, पण आम्ही छातीवर वार झेलणारे आहोत. भाजप एकनाथ शिंदे यांच्यामार्फत सरकार पाडण्याच डाव आखत आहे. पण, तो पूर्ण होणार नाही. शिंदे कडवट शिवसैनिक आहेत. त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला आहे, अनेक घाव छातीवर झेलले आहेत. सध्या जे चित्र निर्णाण केलं जात आहे, भाजपचा डाव यशस्वी होणार नाही," असंही राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाGujaratगुजरात