"शेवटच्या आमदाराला ऑफर होती, पण बाबा ओरडतील म्हणून..." मनसेचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 07:32 PM2022-06-26T19:32:08+5:302022-06-26T19:32:47+5:30

Maharashtra Political Crisis:एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. यावरुन आता मनसेने शिवसेनेवर खोचक शब्दात टीका केली आहे.

Eknath SHinde Revolt | Maharashtra Political Crisis | "The last MLA had an offer, but" MNS leader Amey Khopkar slams Shivsena | "शेवटच्या आमदाराला ऑफर होती, पण बाबा ओरडतील म्हणून..." मनसेचा खोचक टोला

"शेवटच्या आमदाराला ऑफर होती, पण बाबा ओरडतील म्हणून..." मनसेचा खोचक टोला

googlenewsNext

Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास 50 आमदार घेऊन गेल्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. यावरुन आता मनसेने (MNS) शिवसेनेवर खोचक शब्दात टीका सुरू केली आहे.

आज शिवसेना नेते आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हेदेखील गुवाहाटीला रवाना झाले. सकाळपासून सामंत नॉट रिचेबल होते. त्यानंतर उदय सामंत सूरतमार्गे गुवाहाटीला केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली. ANI या वृत्त संस्थेनेही याबाबत ट्विट केले आहे. तसेच, सामंत यांचे विमानातील फोटोही समोर आले आहेत. त्यावरुन, आता मनसेने शिवसेनेला टोला लगावला आहे. 'थेट पक्षप्रमुखांनाच केलं नापास, उतरवला शिवसेनेचा गणवेष, उच्च शिक्षणमंत्र्यांनी घेतला गुवाहाटीच्या शिंदे कॉलेजमध्ये प्रवेश', असे ट्विट खोपकर यांनी केले होते. 

त्यानंतर आता खोपकर यांनी अजून दोन ट्विट करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 'शेवटच्या आमदाराला सुद्धा ऑफर दिली होती…पण… "बाबा ओरडतील!" म्हणून नाही आला,' असे ट्विट करत खोपकर यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. याशिवाय, 'एकनाथ शिंदेंसोबत इतके आमदार निघून गेले आहेत की, उद्धव ठाकरेंनी आता पक्षाचं नाव शिवसेना ऐवजी "शिल्लक सेना" करून घ्यावं...' असा टोलाही खोपकर यांनी दुसऱ्या ट्विटमधून लगावला आहे.

दोन दिवसापूर्वी उदय सामंत म्हणाले होते की, मी अजूनही शिवसेनेतच आहे. सध्या एकसंघ राहणे गरजेचे असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले होते. तसेच मी पक्ष जोडणारा आहे, तोडणारा नाही. जे आपल्यापासून दूर गेले, त्यांच्याशी चर्चा करायला हवी. हे माझे वैयक्तिक मत आहे, असेही त्यांनी म्हटले होते. रण, आता तेही गुवाहटीला निघून गेले आहेत. 
 

Web Title: Eknath SHinde Revolt | Maharashtra Political Crisis | "The last MLA had an offer, but" MNS leader Amey Khopkar slams Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.