एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 17:22 IST2025-11-11T17:20:28+5:302025-11-11T17:22:45+5:30
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार तथा ज्येष्ठ नेते संजय राऊत यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना उपचारासठी भांडूपच्या फोर्टिस रूग्णालयात दाखल केले होते. या रूग्णालयात संजय राऊत यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत.

एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार तथा ज्येष्ठ नेते संजय राऊत यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना उपचारासठी भांडूपच्या फोर्टिस रूग्णालयात दाखल केले होते. या रूग्णालयात संजय राऊत यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत. राऊत यांनी काही दिवसांपूर्वी प्रकृतीत बिघाड झाल्याची आणि उपचार सुरु असण्याची माहिती दिली होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता खासदार संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.
मंत्री उदय सामंत यांनी शिंदे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार सुनील राऊत यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी राऊतांच्या प्रकृतीविषयी सविस्तर माहिती घेतली.
"राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांचे बंधू सुनील राऊत यांना फोन करून प्रकृतीविषयी सविस्तर माहिती घेतली. साहेबांची ही सहृदयता आणि सर्वांप्रती असलेली आपुलकी हीच त्यांची खरी ओळख आहे", अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी पोस्टमध्ये दिली.
राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मा. खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांचे बंधू सुनील राऊत यांना फोन करून प्रकृतीविषयी सविस्तर माहिती घेतली.
— Uday Samant (@samant_uday) November 11, 2025
साहेबांची ही सहृदयता आणि सर्वांप्रती असलेली आपुलकी हीच त्यांची खरी ओळख आहे. #eknathshinde… pic.twitter.com/dOHMAdZ0JP
दरम्यान, संजय राऊत हे प्रकृतीमुळे सार्वजनिक कार्यक्रमांपासून आणि जीवनापासून दूर आहेत. अशातच आता संजय राऊत हे रूटीन चेकअपसाठी फोर्टिस रूग्णालयात दाखल झाले. आवश्यक त्या तपासण्या पूर्ण झाल्यानंतर संजय राऊत हे भांडूप येथील मैत्री निवास्थानी विश्रांती घेणार आहेत.