शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 08:21 IST

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदावरील दावा सोडला असला तरी शिंदे यांना कशा प्रकारे सत्तेत सामावून घ्यायचं, याबाबतचा पेच अद्यापही कायम आहे.

Shiv Sena Eknath Shinde ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महायुतीला निर्विवाद यश मिळालं असलं तरी मुख्यमंत्रिपद आणि खातेवाटपावरून तिढा निर्माण झाल्याने अद्याप नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकलेला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदावरील दावा सोडला असला तरी शिंदे यांना कशा प्रकारे सत्तेत सामावून घ्यायचं, याबाबतचा पेच अद्यापही कायम आहे. भाजप नेतृत्वाकडून त्यांना उपमुख्यमंत्रिपदासह इतर काही मंत्रि‍पदांचं आश्वासन देण्यात आलं आहे. मात्र गृहखातं मिळालं तरच मी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारेन, अशी अट एकनाथ शिंदे यांनी ठेवल्याचे समजते. शिंदे यांची हीच अट भाजपसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं बोललं जात आहे.

महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्रिपद आणि नगरविकास खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. तर उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर गृहखात्याची धुरा होती. हाच फॉर्म्युला कायम ठेवत मुख्यमंत्रि‍पदाच्या बदल्यात आपल्याला गृहखातं मिळावं, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्याची आल्याची माहिती आहे. मात्र पाच वर्ष सरकार सुरळीत चालवायचं असल्यास गृहमंत्रिपद दुसऱ्या पक्षाला देऊन जमणार नाही, असा मतप्रवाह भाजपमध्ये असल्याचे समजते. त्यामुळेच अद्याप भाजपने शिंदे यांची गृहखात्याची मागणी मान्य केलेली नाही. परिणामी सत्तास्थापनेला विलंब होत असल्याचं चित्र आहे.

दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या विश्रांतीसाठी त्यांच्या दरे या मूळ गावी गेले आहेत. वाटाघाटींमध्ये भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने नाराज होऊनच शिंदे यांनी गाव गाठल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगत आहे.

एकनाथ शिंदे मुंबईत कधी परतणार?

सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युल्याबाबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची गुरुवारी मध्यरात्री नवी दिल्लीत बैठक झाल्यानंतर शुक्रवारी मुंबईत परतलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी सातारला रवाना झाले. साताऱ्यातील आपल्या दरे या गावी ते दोन दिवस आराम करण्यासाठी गेले आहेत. महायुतीत आपण नाराज नसून आराम करण्यासाठीच आपण गावी जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान, महायुतीच्या तिन्ही नेत्यांची शुक्रवारी मुंबईत बैठक होण्याची शक्यता होती. परंतु, शिंदे गावी गेल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली. एकनाथ शिंदे हे दोन दिवस सातारला राहणार असून ते १ किंवा २ डिसेंबरला मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे महायुतीची पुढील बैठक त्यानंतरच होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुती