उद्धव ठाकरेंमध्ये 'जासूस करमचंद' अवतरलाय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 11:41 AM2024-02-11T11:41:34+5:302024-02-11T12:41:00+5:30

अडीच वर्षात २ वेळा मंत्रालयात गेलेले फावल्या वेळात सीआयडी आणि क्राईम पेट्रोल पाहत असतील असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray over Abhishek Ghosalkar murder case | उद्धव ठाकरेंमध्ये 'जासूस करमचंद' अवतरलाय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला

उद्धव ठाकरेंमध्ये 'जासूस करमचंद' अवतरलाय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला

पालघर - Eknath Shinde on Uddhav Thackeray ( Marathi News ) अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. घडलेली घटना वेदनादायी आहे परंतु त्यावरून राजकारण करणे हे अतिशय वाईट आहे. फावल्या वेळेत क्राईम पेट्रोल, सीआयडी बघितल्याने उद्धव ठाकरे यांच्यात जासूस करमचंद अवतरला असावा असा टोला शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. तरूण होतकरू मुलाचा मृत्यू झाला. झालेला प्रकार दुर्दैवी तसेच त्याचे राजकारण करणेही दुर्दैवी आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेली व्यक्ती त्यांनी अशाप्रकारे विधाने करणे. फेसबुक लाईव्ह झालंय, पोलीस तपास करतायेत. सत्य बाहेर येणार आहे. कुणालाही पाठिशी घालण्याचं काम होणार नाही. आमचे गृहमंत्री आणि गृह खाते सक्षम आहे. या घटनेवर गृहमंत्री आणि मीदेखील बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीने अशाप्रकारच्या घटनेचं राजकारण करणे अतिशय वाईट आहे. अडीच वर्षात २ वेळा मंत्रालयात गेलेले फावल्या वेळात सीआयडी आणि क्राईम पेट्रोल पाहत असतील. त्यातील जासूस करमचंद त्यांच्यात आवतरला असेल. ही घटना दुर्दैवी आहे, वाईट आहे परंतु राजकारण करायला आपल्या सहकाऱ्याला मुलाचा मृत्यू आणि त्यातून राजकारण करणे हे फार वाईट आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत राज्यात कायद्याचे राज्य आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. कुठल्याही गुन्हेगाराला पाठिशी घातले जाणार नाही. सूड भावनेने आकसाने कुठलेही काम करणार नाही. जे पूर्वी केले आहे त्याचीही माहिती आपल्याला आहे. पत्रकारांना जेलमध्ये टाकलं. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं, कंगना रानौतचं घर पाडलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून अटक केली. साधूचे हत्याकांड झाले. या सगळ्या घटना घडल्या आहेत. ज्या घटना आता घडल्यात त्याचे समर्थन सरकार करणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार. जे आरोप करतायेत त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. विकासाची जी कामे होतायेत त्यातून ही पोटदुखी आहे. जनता सुज्ञ असून येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

"अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरिसने चालवल्या की आणखी कुणी चालवल्या? त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला होता. "अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. मात्र ज्याने हत्या केली त्यानेही नंतर आत्महत्या केली. हे प्रकरण जेवढं दिसतंय तेवढं सोपं दिसत नाही आहे. सूड भावनेतून माणूस अत्यंत टोकाचं पाऊल उचलतो. त्याने टोकाचं पाऊल उचललं असेल तर त्याने आत्महत्या का केली हा प्रश्न राहतो अशी शंका उद्धव ठाकरेंनी उपस्थित करत सरकारवर टीका केली होती.

Web Title: Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray over Abhishek Ghosalkar murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.