शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

भाजपाच्या बैठकीत खडसे समर्थक पदाधिकाऱ्याला मारहाण; दानवे, महाजनांसमोर कार्यकर्त्यांचा राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 2:35 PM

जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी तुफान राडा; एका गटाकडून व्यासपीठाच्या दिशेनं शाईफेक

जळगाव: भुसावळ भाजपा अध्यक्ष निवडीच्या बैठकीत एकनाथ खडसे समर्थक पदाधिकारी सुनील नेवे यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच हा प्रकार घडला. भाजपा जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे यांना दानवे यांच्यासमोरच भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी असलेले रावसाहेब दानवे बैठकीतून निघून गेले.भुसावळ भाजपा अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आज भाजपानं बाबा हरदास मंगल कार्यालयात बैठक आयोजित केली होती. यावेळी भुसावळ शहरातला भाजपाचा एक गट अचानक बैठकस्थळी आला. भुसावळ शहराध्यक्ष निवडीत सुनील नेवे यांनी पदाधिकाऱ्यांची नेमणूक करताना मनमानी केल्याचा आरोप या गटानं केला. त्यांनी व्यासपीठावर शाईफेकदेखील केली. यावेळी व्यासपीठावर गिरीश महाजन उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे रावसाहेब दानवे बैठकीतून निघून गेले.

भुसावळ शहरात सुनील नेवेंची मनमानी सुरू असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी पत्रकंदेखील वाटली. भुसावळ शहर अध्यक्ष पदावर नेवेंनी स्वत:च्या मर्जीतले उमेदवार दिले. ही निवड रद्द न झाल्यास भुसावळ शहरातले भाजपा कार्यकर्ते खूप मोठे लढाई करण्याच्या मनस्थितीत आहेत. नेवेंनी केलेल्या नेमणुका रद्द होत नाहीत, तोपर्यंत भुसावळ शहरात पक्षाच्या जिल्हास्तरीत पदाधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी भाजपाच्या कोणत्याही अधिकृत कार्यक्रमांना येऊ नये. अन्यथा रोषाला सामोरं जावं लागेल, असा थेट इशारा पत्रकांमधून देण्यात आला आहे. 

टॅग्स :BJPभाजपाraosaheb danveरावसाहेब दानवेGirish Mahajanगिरीश महाजन